Health Tips : पावसात भिजायला आवडतं? पण या चुका पडू शकतात महागात, अशी घ्या काळजी
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
अंगात ओले कपडे राहणे, केस ओले राहणे यामुळे अनेक समस्या उद्भवतात. सर्दी, खोकला आणि ताप तर येतोच .
अमरावती: अनेकांना पावसात भिजायला आवडतं. बाहेर असताना जर एखाद्या वेळी पाऊस आला तर आपण भिजतो आणि खूप वेळ तसेच राहतो. पण, हे आपल्याला खूप महागात पडू शकतं. अंगात ओले कपडे राहणे, केस ओले राहणे यामुळे अनेक समस्या उद्भवतात. सर्दी, खोकला आणि ताप तर येतोच . पण, त्याचसोबत फंगल इन्फेक्शन, त्वचेवर बारीक पुरळ येणे, खाज सुटणे, केसांचे आजार विविध आजार होण्याची भीती असते. हे आजार एकदा झाल्यानंतर बरे होण्यास अधिक काळ घेतात. त्यामुळे आधीच काळजी घेणे गरजेचे आहे. पावसांत भिजल्यानंतर कोणती काळजी घ्यावी? याबाबत माहिती डॉ. अनुराधा टाकरखेडे यांनी दिली आहे.
पावसांत भिजल्यानंतर कोणती काळजी घ्यावी?
याबाबत माहिती देताना डॉ. अनुराधा टाकरखेडे सांगतात की, पावसांत भिजणे अनेकांना आवडतं. पण, ते आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक ठरू शकतं. पावसांत भिजल्यानंतर जर ओले कपडे अंगात भरपूर वेळ राहत असतील तर सर्दी, खोकला, ताप तर येतोच. पण, त्वचेसंबंधी आजार देखील होण्याची भीती असते. त्यामुळे पावसांत भिजल्यानंतर काही बाबी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.
advertisement
1. भिजल्यानंतर होईल तितक्या लवकर ओले कपडे बदलवून घ्या.
2. केस कोरडे करूनच बांधा. ओले केस बांधल्यास केसांचे आजार होतात.
3. खूप वेळ अंगात ओले कपडे असल्यास अँटीसेप्टिक साबणाने अंघोळ करावी.
4. घालण्यासाठी घेतलेले कपडे ओलसर असल्यास त्यावर इस्त्री करून घ्या, नंतरच वापरा.
advertisement
5. पावसाळ्यात केस सुकविण्यासाठी हेअर ड्रायर वापरू शकता. कारण काही वेळा पाऊस सुरू असल्यास केस दिवसभर वाळत नाहीत. त्यामुळे आजार उद्भवतात.
6. चेहरा पुसण्यासाठी ओलसर टॉवेल वापरू नका किंवा कोणत्याही ओल्या कपड्याने चेहरा पुसू नका.
7. पावसांत भिजल्यानंतर कोणताही त्रास होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
यासर्व बाबी लक्षात घेतल्यास तुम्ही पावसाळ्यात होणारे आजार टाळू शकता. तसेच पावसाळ्यात कोणतीही वस्तू धुवून आणि स्वच्छ करूनच वापरायला घ्यावी. कारण पावसाळ्यात फंगस लवकर जमतं. पावसाळ्यात स्वच्छता ठेवणे अत्यंत गरजेचे आहे, असे डॉ. अनुराधा टाकरखेडे सांगतात.
view commentsLocation :
Amravati,Amravati,Maharashtra
First Published :
August 20, 2025 6:39 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Health Tips : पावसात भिजायला आवडतं? पण या चुका पडू शकतात महागात, अशी घ्या काळजी

