Brain Care: आठवत नाही, तुमची स्मरणशक्ती कमी झाली का? मग आहारात करा 7 पदार्थांचा समावेश

Last Updated:

आपल्या शरीरातील सर्वात महत्त्वाचा अवयव म्हणजे मेंदू. जीवनशैलीतील बदल, ताणतणाव, अपुरी झोप आणि चुकीचा आहार यामुळे मेंदूचे आरोग्य लवकर ढासळते. 

+
News18

News18

बीड: आपल्या शरीरातील सर्वात महत्त्वाचा अवयव म्हणजे मेंदू. जीवनशैलीतील बदल, ताणतणाव, अपुरी झोप आणि चुकीचा आहार यामुळे मेंदूचे आरोग्य लवकर ढासळते. अल्झायमर, स्मरणशक्ती कमी होणे, नैराश्य अशा समस्या वाढत आहेत. अशा वेळी घरगुती उपाय आणि संतुलित आहार मेंदूला तंदुरुस्त ठेवण्यासाठी उपयुक्त ठरतात.
मेंदूची कार्यक्षमता वाढवण्यासाठी बदाम, अक्रोड आणि काजू यांचा नियमित वापर फायदेशीर ठरतो. यामध्ये असणारे ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिड, जीवनसत्त्व ई आणि अँटीऑक्सिडंट्स मेंदूतील पेशींना मजबुती देतात. अक्रोडचा आकारच मेंदूसारखा असल्याने तो मेंदूच्या आरोग्यासाठी किती उपयुक्त आहे हे सांगितले जाते. तसेच दररोज 5-7 बदाम भिजवून खाल्ल्याने स्मरणशक्ती सुधारते.
advertisement
घरगुती उपायांमध्ये तुपाचा समावेश महत्त्वाचा मानला जातो. शुद्ध गाईचे तूप मेंदूतील पेशींना पोषण देऊन लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढवते. तुपासोबत दूध घेतल्यास झोप चांगली लागते आणि मानसिक थकवा दूर होतो. याशिवाय ब्राह्मी, शंखपुष्पी, अश्वगंधा यांसारख्या आयुर्वेदिक वनस्पतींचे सेवन मेंदूला शांत ठेवते आणि ताण कमी करते.
हिरव्या भाज्या, फळे आणि धान्य यांचाही मेंदूच्या आरोग्यात मोठा वाटा असतो. पालक, मेथी, ब्रोकोली, सफरचंद, द्राक्षे आणि संत्री यामध्ये असणारे पोषक घटक स्मरणशक्ती सुधारतात. मासे आणि अंड्याचा पिवळा बलक यामध्ये असलेले प्रथिने आणि ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिड  मेंदूच्या पेशींची झीज कमी करतात. त्यामुळे संतुलित आहार घेतल्यास मेंदू दीर्घकाळ सक्रिय राहतो.
advertisement
नियमित व्यायाम, ध्यानधारणा, पुरेशी झोप आणि ताण कमी करणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे. व्यायामामुळे मेंदूकडे रक्तपुरवठा वाढतो, तर ध्यानामुळे मानसिक शांती मिळते. झोपेच्या अभावामुळे स्मरणशक्ती कमकुवत होते, त्यामुळे किमान सात तासांची झोप आवश्यक आहे. योग्य आहारासोबतच या सवयी अंगीकारल्यास मेंदूचे आरोग्य दीर्घकाळ सुरक्षित ठेवणे शक्य होते.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Brain Care: आठवत नाही, तुमची स्मरणशक्ती कमी झाली का? मग आहारात करा 7 पदार्थांचा समावेश
Next Article
advertisement
OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement