Arthritis Care: पावसाळ्यात संधिवाताचा त्रास? आताच टाळा या सवयी, होईल शरीराला फायदा, Video
- Reported by:Pragati Bahurupi
- Published by:Mohan Najan
Last Updated:
पावसाळ्यामध्ये आम वात आणि संधी वात हे दोन वाताचे प्रकार जास्त जोर धरतात. यामध्ये सांधे दुःखी जास्त प्रमाणात असते. त्यामुळे वात ही व्याधी असणाऱ्या रुग्णांनी काळजी घेणे आवश्यक आहे.
अमरावती: पाऊस पडला की, वातावरणात आर्द्रता निर्माण होते. त्यामुळे वात व्याधी असणाऱ्या रुग्णांना त्रास होण्यास सुरुवात होते. काही वेळा त्रास इतका वाढतो की, रुग्णांना हालचाल सुद्धा करता येत नाही. पावसाळ्यामध्ये आमवात आणि संधिवात हे दोन वाताचे प्रकार जास्त जोर धरतात. यामध्ये सांधेदुखी जास्त प्रमाणात असते. त्यामुळे वात ही व्याधी असणाऱ्या रुग्णांनी काळजी घेणे आवश्यक आहे. वात व्याधी असणाऱ्या रुग्णांनी काय काळजी घ्यावी? याबाबत माहिती डॉ. धीरज आंदे यांनी दिली आहे.
पावसाळ्यात वात व्याधी जास्त प्रमाणात वाढते. त्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे? याबाबत लोकल 18 ला माहिती देताना डॉ. धीरज आंदे सांगतात की, पावसाळ्यात वातावरणात आर्द्रता निर्माण होते. त्यामुळे वात व्याधी असणाऱ्या रुग्णांना त्रास होतो. पावसाळ्यात जास्तीत जास्त आमवात आणि संधिवात हे दोनच प्रकार जास्त रुग्णांमध्ये आढळून येतात. त्यामध्ये सांधेदुखी, अंगावर सूज येणे अशी अनेक लक्षणे आढळून येतात. काही वेळा हा व्याधी रुग्णांना कायमच जाग्यावर बसवतो. त्यामुळे काळजी घेणे गरजेचे आहे.
advertisement
कोणती काळजी घ्यावी?
वात व्याधी असणाऱ्या रुग्णांनी पावसाळ्यात थंड पदार्थ सेवन करणे टाळले पाहिजे. त्याचबरोबर घरातील कामे करताना सुद्धा थंड पाण्यासोबत जास्त संपर्क येणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. पाणी उकळून पिणे सुद्धा सुरू करायला पाहिजे. त्याचबरोबर आंघोळीला सुद्धा गरम पाणी घ्यायला पाहिजे. थंड पाण्यासोबत संपर्क कमी झाला की, वात व्याधी नियंत्रणामध्ये राहण्यास मदत होईल.
advertisement
आहारात कशाचा समावेश असावा?
त्याचबरोबर आहारात गरम पदार्थांचा समावेश करू शकता. त्यामध्ये मिरे, लसूण, अद्रक आणि इतरही काही पदार्थांचा समावेश तुम्ही करू शकता. त्याचबरोबर योगा करणे, योग्य आहार घेणे, पुरेशी झोप घेणे सुद्धा गरजेचे आहे.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे शरीराच्या कोणत्याही भागात सूज आली असेल किंवा दुखत असेल आणि याला 7 दिवसांच्यावर दिवस झाले असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. डॉक्टरांचा सल्ला घेऊन तुमच्या काही टेस्ट झाल्यानंतर तुम्हाला नेमका कोणत्या प्रकारचा वात आहे, हे लक्षात येईल. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. शरीरात काही बदल जाणवल्यास किंवा त्रास होत असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे डॉ. धीरज आंदे यांनी सांगितले.
Location :
Amravati,Maharashtra
First Published :
Jun 04, 2025 3:43 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Arthritis Care: पावसाळ्यात संधिवाताचा त्रास? आताच टाळा या सवयी, होईल शरीराला फायदा, Video







