Monsoon Health Tips: पावसाळ्यात त्वचेचे कोणते आजार होतात? कशी घ्यावी काळजी, डॉक्टरांनी दिला महत्त्वाचा सल्ला
- Published by:Mohan Najan
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
Monsoon Health Tips: पावसाळ्यामध्ये आपण पावसात भिजतो किंवा चिखलाच्या पाण्यातून जाणं होतं. यामुळे आपल्याला मोठे इन्फेक्शन होते.
छत्रपती संभाजीनगर : पावसाळा सुरू आहे. पावसाळा म्हटलं की अनेक असे त्वचेचे आजार होत असतात. पावसाळ्यामध्ये आपण पावसात भिजतो किंवा चिखलाच्या पाण्यातून जाणं होतं. यामुळे आपल्याला मोठे इन्फेक्शन होते. तर यावर आपण कशा पद्धतीने काळजी घ्यावी? याबद्दलचं आपल्याला त्वचारोग तज्ज्ञ डॉक्टर सुनिता शेळके यांनी माहिती सांगितलेली आहे.
advertisement
पावसाळ्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जर जास्त वेळ पाण्यात राहिलो तर आपल्या पायाला चिखल्या होतात. दुसरा महत्त्वाचा म्हणजे की जर तुम्ही पावसात भिजलेत किंवा रस्त्यामध्ये साचलेल्या पाण्यातून जर आपण चालत गेलो की त्यामुळे आपल्याला फंगल इन्फेक्शन होतं.
Monsoon Tips : पावसाळ्यातील त्वचेच्या समस्यांवर रामबाण उपाय! 'ही' पानं वापरण्याची पद्धत जाणून घ्या..
advertisement
पावसाळ्यामध्ये ह्युमिडिटी जास्त असते आणि त्यामुळे घाम देखील मोठ्या प्रमाणात येतो. यामुळे देखील आपल्याला घामोळ्या येतात. तसेच इतर देखील फंगल इन्फेक्शन पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात होत असतात. यावर तुम्ही सगळ्यात पहिले तर तुमच्या जे शरीर असते एकदम कोरडे ठेवणे गरजेचे आहे. म्हणजेच की जर तुम्ही पावसात भिजून आले असाल तर तुम्ही सगळ्यात पहिले तुमचं शरीर कोरडे करणे गरजेचे आणि जर तुम्ही असं नाही केलं तर यामुळे तुम्हाला फंगल इन्फेक्शन होऊ शकते.
advertisement
तसंच तुम्ही अँटी फंगल पावडर देखील वापर करू शकता. पावसाळ्यामध्ये घाम मोठ्या प्रमाणात असतो तर तुम्ही प्रत्येक वेळेस घाम ओल्या कपड्याकडून पुसावा. तसेच जर तुम्हाला फंगल इन्फेक्शन झालं असेल तर तुम्ही घरगुती इलाज न करता त्वरित चांगल्या प्रकारे इलाज करणाऱ्या डॉक्टरांना दाखवा. ही सर्व काळजी जर तुम्ही घेतली तर पावसामध्ये कुठल्याही प्रकारचे आजार आणि त्याचा इफेक्ट होणार नाही, असं तज्ज्ञ डॉक्टर सुनिता शेळके यांनी दिली.
advertisement
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
July 23, 2025 4:29 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Monsoon Health Tips: पावसाळ्यात त्वचेचे कोणते आजार होतात? कशी घ्यावी काळजी, डॉक्टरांनी दिला महत्त्वाचा सल्ला