Snake : साप विषारी आहे की बिनविषारी, कसं ओळखायचं? ही ट्रिक वापरून पाहा वाचेल जीव
- Published by:Pooja Pawar
Last Updated:
भारतात किती प्रकारचे साप आढळतात आणि त्यापैकी किती साप हे खरंच विषारी असतात याविषयी जाणून घेऊयात.
पावसाळ्यात बिळांमध्ये पाणी शिरल्याने सापांसारखे धोकादायक प्राणी मानवी वस्तीत शिरतात. अनेकदा ते घरांमध्ये सुद्धा लपून बसतात आणि काहीवेळा ते माणसांना दंश करतात. मागील काही वर्षात सापांच्या दंशाने हजारो व्यक्तींचा मृत्यू झालेला आहे. तेव्हा भारतात किती प्रकारचे साप आढळतात आणि त्यापैकी किती साप हे खरंच विषारी असतात याविषयी जाणून घेऊयात.
आतापर्यंत केलेल्या शोध कार्यानुसार भारत, पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि श्रीलंका इत्यादी क्षेत्रांमध्ये मुख्यतः चार प्रकारचे विषारी साप आढळतात. या चार सापांशिवाय इतर सर्व साप तुलनेने कमी विषारी किंवा बिनविषारी असतात. म्हणजेच अशा सापांनी दंश केल्यास माणसाचा मृत्यू होत नाही. मात्र अनेकांना विषारी आणि बिनविषारी साप ओळखता येत नाहीत. तेव्हा यासाठी काही टिप्स आणि ट्रिक्स उपयोगी ठरू शकतात.
advertisement
भारतात आढळणाऱ्या विषारी सापांमध्ये कोब्रा, नाग, रसेल वाइपर्स आणि भारतीय क्रेट इत्यादींचा समावेश असतो. याशिवाय जे साप आढळतात ते तुलनेने कमी विषारी किंवा बिनविषारी असतात.
कसे ओळखलं विषारी साप?
विषारी नागांची सर्वात महत्वाची ओळख म्हणजे त्यांचा त्रिकोणी चेहरा आणि उग्र त्वचा. तर रसेलचे वाइपर हे हलक्या पिवळ्या रंगाचे असतात. तसेच त्यांच्या त्वचेवर अंगठ्याच्या आकाराचे ठसे असतात. त्यांचा विष असलेला दात हा सर्वात लांब आणि तीक्ष्ण असतो. भारतीय क्रेट हा तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात विषारी साप असतो. या सापाची त्वचा चमकदार असते आणि ते खूप लवकर दंश करतात. हा साप चावल्यावर काही तासांमध्ये माणसाचं नर्वस सिस्टम हलत आणि उपचारांमध्ये दिरंगाई झाल्याने मृत्यू सुद्धा होऊ शकतो.
advertisement
साप चावण्याच्या सर्वाधिक घटना या भारतात होतात. नागा सारखा विषारी साप जेव्हा पूर्ण शक्तीने चावतो तेव्हा मानवी शरीरात हे विष जाते आणि त्यावर योग्यवेळी उपचार न मिळाल्यास माणसाचा मृत्यू सुद्धा होऊ शकतो. पण कोब्रा आणि इतर साप कधीकधी खूप हलके चावतात. यामुळे यांचे विष मानवी शरीरात प्रवेश करत नाही. साप पकडण्याचे प्रशिक्षण नसेल तर सापापासून दूर राहण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jul 17, 2024 11:10 AM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Snake : साप विषारी आहे की बिनविषारी, कसं ओळखायचं? ही ट्रिक वापरून पाहा वाचेल जीव








