advertisement

जगातील सगळे साप संपले तर काय होईल? पर्यावरणासाठी ते किती गरजेचे?

Last Updated:

डायनासोर कालांतराने नष्ट झाले पण साप मात्र अजूनही पृथ्वीवर आहेत, पण यात असा प्रश्न उपस्थीत होतो की समजा साप या जगातून नाहीसे झाले, तर काय होईल?

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
मुंबई : साप हा जमिनीवरील सरपटणारा आणि सर्वात धोकादायक प्राणी आहे. त्याच्या एका दंशाने एखाद्याचा मृत्यू हेऊ शकतो. ज्यामुळे लोक देखील सापाला घाबरतात. असं म्हणतात की साप पृथ्वीवर डायनासोरच्या काळापासून आहे. अलीकडेच ब्राझीलमधील एका ठिकाणी जमिनीचे उत्खनन करण्यात आले तेव्हा संशोधकांना लाखो वर्षे जुना जीवाश्म सापडला. तपासणी केली असता असे आढळून आले की ते सापाचे जीवाश्म आहे आणि ते त्या काळापासूनचे आहे जेव्हा डायनासोर देखील पृथ्वीवर होते.आश्चर्याची बाब म्हणजे रिसर्चमध्ये असं समोर आलं ही त्यावेळी सापाला चार पाय होते.
डायनासोर कालांतराने नष्ट झाले पण साप मात्र अजूनही पृथ्वीवर आहेत, पण यात असा प्रश्न उपस्थीत होतो की समजा साप या जगातून नाहीसे झाले, तर काय होईल?
पृथ्वीवर साप नसतील तर पर्यावरणावर काय परिणाम होईल हे आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत. पण त्याआधी तुम्हाला सापांच्या पायाची कहाणी जाणून घेणे आवश्यक आहे.
advertisement
वास्तविक, सापाच्या या जीवाश्मामध्ये ज्या प्रकारचे पाय दिसले ते खूपच लहान आणि नाजूक होते. काही शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की त्यावेळी सापांनी पोहण्यासाठी या पायांचा वापर केला असावा. तर, जमिनीवर ते फक्त रांगतच फिरत असत. ही कथा आहे सापाच्या पायांची. आता आपण सांगू या जगातून साप नाहीसे झाले तर काय होईल?
advertisement
साप हा फक्त माणसांना चावायलाच नसतो .तर पर्यावरणासाठीही त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे. सापांचा नायनाट केल्यास उंदीर काही दिवसांतच शेतकऱ्यांची शेतजमिनी नष्ट करतील. याशिवाय सापांना आपले भक्ष्य बनवणारे प्राणीही नामशेष होण्याच्या मार्गावर येतील. सापाच्या विषापासून अनेक प्रकारची औषधे बनवली जातात. या पृथ्वीवरून साप नाहीसे झाले तर त्या औषधांचा तुटवडा निर्माण होईल. याशिवाय जर साप नामशेष झाले तर पृथ्वीवर बेडकांची संख्या इतकी वाढेल की तुम्ही कल्पनाही करू शकत नाही.
view comments
मराठी बातम्या/Viral/
जगातील सगळे साप संपले तर काय होईल? पर्यावरणासाठी ते किती गरजेचे?
Next Article
advertisement
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान; सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय, ज्याचा कोणी विचारच केला नव्हता
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान, सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय...
  • सोनं विसरा, हा पर्याय पाहा

  • गुंतवणुकीचा सर्वात मोठा 'गेम' उघड

  • एका निर्णयाने तुमचं नशीब बदलू शकतं

View All
advertisement