Tips And Tricks : चहा प्यायला आवडतं, पण तुमची चहा पत्ती शुद्ध आहे ना? 'या' टेस्टने काही सेकंदात ओळखा

Last Updated:

How to differentiate between real vs fake tea : सध्या बाजारात खाण्या-पिण्याच्या पदार्थांमध्ये भेसळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. खरे काय आणि बनावट काय, हे खरेदीच्या वेळी ओळखणे सोपे नसते. अशा वेळी घरी आल्यावरच शुद्धतेची खात्री करता येते.

शुद्ध आणि भेसळयुक्त चहा पत्ती कशी ओळखायची?
शुद्ध आणि भेसळयुक्त चहा पत्ती कशी ओळखायची?
मुंबई : आपल्या देशात चहा प्रेमींची कमतरता नाही. काही लोकांना तर सकाळी उठताच बेडवर गरमागरम चहा हवा असतो. काहीजण दिवसाला 4-5 कप चहा पितात. चहा वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये, चवीत आणि पद्धतींनी बनवला जातो. हर्बल टीपेक्षा दूधाचा चहा पिणाऱ्यांची संख्या जास्त आहे. चहा बनवण्यासाठी बाजारात अनेक प्रकारच्या चहा पत्त्या मिळतात. काही पॅकेटमध्ये तर काही ठिकाणी मोकळी चहा पत्तीही विकली जाते.
मात्र सध्या बाजारात खाण्या-पिण्याच्या पदार्थांमध्ये भेसळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. खरे काय आणि बनावट काय, हे खरेदीच्या वेळी ओळखणे सोपे नसते. अशा वेळी घरी आल्यावरच शुद्धतेची खात्री करता येते. चहा पत्त्यांमध्येही आता भेसळ केली जात असल्याच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे घरच्या घरी खास पद्धतीने शुद्ध आणि भेसळयुक्त चहा पत्ती ओळखता येते.
advertisement
‘फूडफार्मर’ नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शुद्ध आणि भेसळयुक्त चहा पत्ती ओळखण्यासाठी एक अतिशय सोपी टेस्ट सांगितली आहे. चला पाहूया याबद्दल संपूर्ण माहिती आणि ही टेस्ट कशी करायची.
शुद्ध आणि भेसळयुक्त चहा पत्ती कशी ओळखायची?
तुम्ही कोणत्याही ब्रँडची किंवा उघडी चहा पत्ती आणली असेल आणि तिची चव योग्य वाटत नसेल किंवा चहा बनवल्यावर रंग नीट येत नसेल, तर घरीच सहज तपासणी करता येते. चहा पत्तीत भेसळ आहे की नाही हे पाहण्यासाठी एक छोटीशी ‘मॅग्नेट टेस्ट’ करता येते. या टेस्टमधून चहा पत्तीत लोखंडी भुसा (iron filings) मिसळलेले आहे का? हे कळते. जर असे टेस्ट घरी शक्य असतील तर ब्रँड्सनीही प्रत्येक बॅचची नीट तपासणी करून शुद्धतेचे रिपोर्ट दाखवायला हवेत.
advertisement
चुंबक टेस्ट कशी करायचा?
- चहा पत्तीची शुद्धता तपासण्यासाठी दोन वेगवेगळ्या वाट्यांमध्ये थोडी-थोडी चहा पत्ती घ्या. आता त्या वाटीत छोटा चुंबक टाका. जर चहा पत्ती चुंबकाला चिकटली, तर समजा ती भेसळयुक्त आहे आणि त्यात लोखंडी भुसा मिसळलेला आहे.
- जर चुंबक बाहेर काढल्यानंतर एकही चहा पत्तीचा कण त्याला चिकटला नसेल, तर समजा चहा पत्ती खरी आणि शुद्ध आहे आणि त्यात कोणतीही भेसळ केलेली नाही.
advertisement



 










View this post on Instagram























 

A post shared by Revant Himatsingka (@foodpharmer)



advertisement
- खरं तर काही कंपन्या चहा पत्तीचे वजन वाढवण्यासाठी त्यात लोखंडी भुसा मिसळतात. अशा चहा पत्त्यांपासून बनलेला चहा आरोग्यासाठी किती घातक असू शकतो, याची कल्पना न केलेलीच बरी. त्यामुळे पुढच्यावेळी जेव्हा तुम्ही चहा पत्ती खरेदी कराल, तेव्हा वापरण्यापूर्वी हा मॅग्नेट टेस्ट नक्की करून पाहा.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Tips And Tricks : चहा प्यायला आवडतं, पण तुमची चहा पत्ती शुद्ध आहे ना? 'या' टेस्टने काही सेकंदात ओळखा
Next Article
advertisement
BMC Election Neil Somaiya : सोमय्यांकडून मुलाविरोधातील लढतीत कोणी नसल्याचा दावा, ठाकरे गटाचा मोठा डाव, वॉर्ड १०७ मधलं गणित बदललं
सोमय्यांकडून मुलाविरोधातील लढतीत कोणी नसल्याचा दावा, ठाकरे गटाचा मोठा डाव, वॉर्ड
  • नील सोमय्या यांच्याविरोधात ठाकरेंचा उमेदवार नसल्याचा दावा केला होता.

  • नील सोमय्या यांचा विजय सहज सोपा झाला असल्याचा दावा करण्यात आला होता.

  • मात्र, आता ठाकरे गटाने आता मोठा डाव खेळला आहे.

View All
advertisement