Shocking : ऑनलाईन ओळख! शाळेतून आईला न सांगता प्रियकरासोबत गेली अन् तिथंच घडलं भयंकर: संभाजीनगर हादरलं
- Reported by:Apurva Pradip Talnikar
- local18
- Published by:Tanvi
Last Updated:
Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर इन्स्टाग्राम ओळखीचा गैरफायदा घेऊन शाहरुख सिकंदर पठाण याने अत्याचार केला. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
छत्रपती संभाजीनगर : सोशल मीडियाच्या माध्यमातून झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेत एका अल्पवयीन शालेय मुलीला जबरदस्तीने पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी शाहरुक सिकंदर पठाण (वय 23, रा. गल्ली नं. 10, मिसारवाडी) याला अटक केली असून त्याला रविवार, 4 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश विशेष न्यायाधीश एन. एस. मोमीन यांनी दिले आहेत.
सोशल मीडियावरून सुरू झाला भयंकर कट
या प्रकरणात 16 वर्षीय पीडित मुलीने पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीनुसार सुमारे पाच ते सहा महिन्यांपूर्वी पीडितेची आरोपी शाहरुक पठाण याच्याशी इन्स्टाग्रामवर ओळख झाली होती. या ओळखीचे पुढे मोबाईलवर संभाषणात रूपांतर झाले. दरम्यान आरोपीने पीडितेकडे लग्नाची मागणी घातली होती; मात्र पीडितेने तो प्रस्ताव स्पष्टपणे नाकारला होता.
advertisement
दरम्यान1 जानेवारी रोजी सकाळी पीडिता ही तिच्या आईसोबत शाळेत गेली होती. आई शाळेतून निघून गेल्यानंतर काही वेळातच आरोपी तेथे आला. लग्नाबाबत पुन्हा बोलायचे असल्याचे कारण सांगत त्याने पीडितेला जबरदस्तीने दुचाकीवर बसवले. त्यानंतर तिला शेंद्रा परिसरातील वरुड काझी गावाजवळील एका कांद्याच्या गोडाऊनमध्ये घेऊन जाऊन तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला.
घटनेनंतर पीडिता रडत असताना तेथील स्थानिक नागरिकांनी तिचा आवाज ऐकून धाव घेतली आणि तिला मदत केली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले. पुढील तपास सुरू असून, आरोपीविरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
advertisement
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 04, 2026 12:53 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Shocking : ऑनलाईन ओळख! शाळेतून आईला न सांगता प्रियकरासोबत गेली अन् तिथंच घडलं भयंकर: संभाजीनगर हादरलं










