Weight Loss : आठवड्याभरात 2 किलो वजन कमी करायचंय? 7 दिवस नाश्त्यात 'हा' डायट प्लॅन फॉलो करा

Last Updated:

लठ्ठपणाचे अनेक प्रकार असले तरी पोटावर वाढलेली चरबी ही बहुतांश लोकांसमोरची प्रमुख समस्या असते. पोटावरची चरबी करून वजन नियंत्रणात आणण्यासाठी तुम्ही खास डाएट प्लॅन फॉलो केला पाहिजे. 

आठवड्याभरात 2 किलो वजन कमी करायचंय? 7 दिवस नाश्त्यात 'हा' डायट प्लॅन फॉलो करा
आठवड्याभरात 2 किलो वजन कमी करायचंय? 7 दिवस नाश्त्यात 'हा' डायट प्लॅन फॉलो करा
बदललेली जीवनशैली, व्यायामाचा अभाव, चुकीचा आहार आदी कारणांमुळे लठ्ठपणाची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. लठ्ठपणामुळे अनेक आजारांचा धोका वाढतो. त्यामुळे वाढतं वजन नियंत्रणात ठेवणं गरजेचं आहे. लठ्ठपणाचे अनेक प्रकार असले तरी पोटावर वाढलेली चरबी ही बहुतांश लोकांसमोरची प्रमुख समस्या असते. पोटावरची चरबी करून वजन नियंत्रणात आणण्यासाठी तुम्ही खास डाएट प्लॅन फॉलो केला पाहिजे.
भारतातील बहुतांश लोक पोटावरील चरबीनं त्रस्त असल्याचं पाहायला मिळतं. पोटावरची चरबी कमी झाल्यास आजारांची जोखीमही घटते. पोटावरची चरबी कमी करण्यासाठी काही नैसर्गिक उपाय फायदेशीर ठरू शकतात. त्यासाठी आहार पद्धतीत बदल करावा लागेल. तसेच व्यायामावर भर दिला तर या गोष्टी गेमचेंजर ठरू शकतात.
advertisement
आहाराचा विचार करता सात दिवसांचं एक वेळापत्रक ठरवा. त्यानुसार पहिल्या दिवशी नाश्त्यात केवळ इडली, डोशाचा समावेश करा. हेल्थलाइनच्या माहितीनुसार, दिवसाची सुरुवात पाणी पिऊन करा. त्यामुळे शरीर हायड्रेट राहते. पाण्यामुळे पचन क्रिया जलद होते आणि भूक शमते. पुरेसं पाणी प्यायल्यास शरीरातील कॅलरींवर नियंत्रण ठेवता येतं. दिवसाच्या पहिल्या भोजनात प्रोबायोटिक्स पदार्थांचा समावेश करा. यात तुम्ही कमी फॅट्स असलेलं दही समाविष्ट करू शकता. सकाळच्या नाश्त्यावेळी तुम्ही इडली, भात किंवा आंबवलेल्या उडदाच्या डाळीचा डोसा खाऊ शकता.या अन्न पदार्थांमुळे आतड्यांचे आरोग्य सुधारेल. तसेच हे पदार्थ फॅट्स कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. प्रोबायोटिक्स पदार्थांचं सेवन न करणाऱ्या लोकांच्या तुलनेत हे पदार्थ खाणाऱ्या लोकांमध्ये फॅट बर्नचं प्रमाण जास्त असतं असं अनेक संशोधनातून समोर आलं आहे.
advertisement
आहार तज्ज्ञांच्या मते, सप्ताहाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात तुम्ही दूधाच्या चहाऐवजी ग्रीन टी घेऊन करू शकता. ग्रीन टीमुळे फॅट्स बर्न होतात. ग्रीन टी मध्ये कॅटेचीन नावाचं अँटिऑक्सिडंट असतं. यामुळे बॉडी फॅट बर्न होण्यास मदत मिळते. ग्रीन टी पोटाची चरबी करण्यात फायदेशीर ठरतो. सकाळच्या नाश्त्यात ग्रीन टी नंतर ओट्सचं सेवन करावं. ओट्स खाल्ल्यानं पोट दीर्घकाळ भरल्यासारखं वाटतं आणि वजन कमी करण्यास मदत होते.
advertisement
आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी नाश्त्यात अंड्याचं सेवन करू शकता. अंड्यात फायबर आणि प्रोटीन मुबलक असतात त्यामुळे दीर्घकाळ पोट भरल्यासारखं वाटतं. तसेच क्रेव्हिंग कंट्रोल राहते. अंडी सेवन केल्यास ब्लड शुगर लेव्हल नॉर्मल राहते. पचन क्रिया सुधारते. तुम्ही सकाळच्या नाश्त्यात शिजवलेल्या भाज्यांसह उकडलेली अंडी खाऊ शकता.
ग्रीक दही, प्रोटीन स्मूदी सारख्या पदार्थांत पोषक घटक मुबलक असतात. यामुळे वजनही कमी होते. प्रोटीन पचवण्यासाठी जास्त ऊर्जेची गरज असते. त्यामुळे कॅलरी बर्न होण्यास मदत होते आणि दिवसभरात खाण्याची इच्छा फारशी होत नाही. सिझनल बेरीसह सत्तू स्मूदी बनवा. याच्या सेवनाने फ्री रॅडिकल्स मुळे शरीराचे होणारे नुकसान टळतं. अँटीऑक्सिडंट मुबलक असलेल्या पदार्थांपासून तयार केलेली स्मूदी खाल्यास दिवसभरात खाण्याची इच्छा नियंत्रणात राहते.
advertisement
आठवड्याच्या पाचव्या दिवशी स्प्राउट सॅलड सेवन करावं. नाश्त्यात फायबर मुबलक असलेलं सॅलड खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते. स्प्राउटसोबत फायबरयुक्त फळं आणि भाज्यांचा नाश्त्यात समावेश करू शकता. यामुळे भूक कमी लागते, आतड्याचं आरोग्य सुधारतं आणि वजन नियंत्रणात राहतं.
आठवड्यातील सहाव्या दिवशी तुम्ही नाश्त्यात भाज्यांचा चीला खाऊ शकता. चिरलेल्या भाज्यांसोबत बेसन किंवा डाळीचा चीला भूक शमवू शकतो. क्रेव्हिंग नियंत्रणात राहते. सकाळी नाश्त्यात चीला सेवन केल्यास पोटाची चरबी कमी होते. आठवड्याच्या सातव्या दिवसाची सुरुवात तुम्ही बदामाच्या दुधानं करू शकता. बदामाचं दूध प्यायल्याने पोट भरेल आणि खाण्याची इच्छा नियंत्रणात राहील.
advertisement
एकूणच, सकाळचा नाश्ता पोटावरची चरबी कमी करण्यात मोठा अडसर ठरू शकतो. त्यामुळे नाश्त्यात योग्य पदार्थांचं सेवन गरजेचं आहे. हेल्दी पदार्थांचा नाश्त्यात समावेश करत दिवसाची सुरुवात करावी. असं न केल्यास पचनशक्ती मंदावते आणि ऊर्जेची पातळी कमी होते. त्यामुळे सकाळचा नाश्ता योग्य असावा तरच लठ्ठपणा, पोटावरची चरबी कमी होईल.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Weight Loss : आठवड्याभरात 2 किलो वजन कमी करायचंय? 7 दिवस नाश्त्यात 'हा' डायट प्लॅन फॉलो करा
Next Article
advertisement
KDMC Election: कल्याण-डोंबिवलीत युतीचे ११ उमेदवार बिनविरोध,  मनसे-ठाकरे गटासह काँग्रेसचा हातभार! पडद्यामागची Inside Story
कडोंमपात युतीचे ११ जण बिनविरोध, मनसेसह ठाकरे गटाचाही हातभार, Inside Story
  • कल्याण-डोंबिवली महापालिकेत भाजप आणि शिंदे गटाच्या युतीचे ११ उमेदवार बिनविरोध निव

  • बिनविरोध निवडणुकीमागे स्थानिक राजकारण, नेते महत्त्वाचे असल्याचे म्हटले जात आहे.

  • महत्वाची भूमिका मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी बजावली

View All
advertisement