चपाती करताना लाटण्याला कणीक चिकटते? वापरा या टिप्स चपाती बनेल परफेक्ट
- Published by:Pooja Pawar
- trending desk
Last Updated:
Cooking Tips In Marathi : पोळ्या करणं हे अनेकांना अत्यंत किचकट काम वाटतं. काहींना त्या गोल लाटता येत नाहीत. पोळ्या करताना पोळपाट लाटण्याला कणीक चिकटते ही अनेकींची तक्रार असते.
भारतीय जेवणात पोळी किंवा चपाती हा रोजच्या रोज ताजा करुन खाल्ला जाणारा पदार्थ आहे. छान गरम मऊसूत पोळी तव्यावरुन पानात पडली की खाणाऱ्या व्यक्तीला सहज दोन घास जास्त जातात. असं असलं तरी पोळ्या करणं हे अनेकांना अत्यंत किचकट काम वाटतं. काहींना त्या गोल लाटता येत नाहीत. पोळ्या करताना पोळपाट लाटण्याला कणीक चिकटते ही अनेकींची तक्रार असते. त्यामुळे पोळी लाटताना ती फाटते. अशा वेळी काही छोट्या छोट्या पण महत्त्वाच्या गोष्टी केल्या तर कणीक चिकटणार नाही आणि पोळ्या करणं हा व्यापही वाटणार नाही.
तुमची कणीक मळायची पद्धत योग्य असेल तर पोळ्या करणं हे काम अगदी सहज हातावेगळं होईल. एका मोठ्या परातीत किंवा पसरट भांड्यात किंचित पाणी, तेल आणि मीठ घेऊन त्यात हवं तेवढं पीठ घ्या. हवं तेवढं पाणी थोडं थोडं घालून कणीक मळा. त्यामुळे तुमची कणीक फार पातळ होणार नाही. कणीक खूप पातळ मळली गेली असेल तर ती पोळपाट लाटण्याला चिकटते. त्यामुळे कणीक मळून झाल्यावर लगेच पोळ्या करु नका. मळलेली कणीक थोडा वेळ मुरायला ठेवा. कणीक हलक्या हाताने मळा. कणकेचा गोळा घेऊन पोळी लाटताना लाटणं सलग फिरवू नका. सतत उचलून लाटणं फिरवा. कणीक खूपच पातळ झाली असेल तर थोडा वेळ फ्रिजमध्ये ठेवा आणि नंतर पोळ्या लाटा.
advertisement
कणीक फ्रीजमध्ये ठेवत असाल तर ती थंडगार होणार नाही याची काळजी घ्या. आदल्या दिवशी मळून फ्रीजमध्ये ठेवलेली कणीक पोळ्या करण्यापूर्वी किमान अर्धा तास बाहेर काढून ठेवा. मात्र बाहेर काढलेली कणीक खूप पातळ होण्याआधी पोळ्या करुन घ्या. तुम्ही कितीही चांगली कणीक भिजवली तरी लाटताना पोळी पोळपाट किंवा लावण्यासाठी चिकटत असेल तर ॲल्युमिनिअम फॅाईलची तुम्हाला खूप मदत होऊ शकते. फॅाईलचा एक तुकडा पोळपाटावर पसरुन त्यावर कणकेचा गोळा ठेवून हळूहळू पोळी लाटली तर पोळपाटाला ती चिकटणार नाही. त्यामुळे तुमच्या पोळ्या झटपट होतील.
advertisement
काही वेळा तुमचं पोळपाट लाटणं चांगलं नसेल तर त्यामुळे कणीक त्याला चिकटू शकते. त्यामुळे चांगलं पोळपाट लाटणं निवडणंही महत्त्वाचं आहे. लाटण्याला थोडं तेल लावलं आणि थोडं थोडं कोरडं पीठ घेऊन पोळी लाटली तरी चिकटण्याचा त्रास होणार नाही आणि पोळ्या करणं हे काम सोपं होईल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 20, 2024 6:10 AM IST