Summer Tips : दिवस-रात्र पंखा चालवाल तरी येणार नाही जास्त बिल! फक्त या गोष्टी तुम्हाला माहित असाव्या..
- Published by:Pooja Jagtap
- local18
Last Updated:
How to save electricity : पंखा तुम्हाला दिवसभर वापरायचा असेल तर काही प्रकारे तुम्ही जास्त बिल येण्यापासून रोखू शकता. होय, काही गोष्टींची काळजी घेऊन तुम्ही वीजबिल वाचवू शकता.
मुंबई : उन्हाळ्यात उष्णता आणि घामामुळे आपण त्रस्त होतो, अशावेळी पंखाच आपल्याला अराम देतो. एसी नसेल त्यांच्या घरात पंखा दिवस रात्र सुरु असतो. पण याचमुळं वीजबिलाचा बोजाही आपल्यावर वाढतो. पंखा तुम्हाला दिवसभर वापरायचा असेल तर काही प्रकारे तुम्ही जास्त बिल येण्यापासून रोखू शकता. होय, काही गोष्टींची काळजी घेऊन तुम्ही वीजबिल वाचवू शकता.
दिवसरात्र पंखा चालवल्यामुळे घर थंड तर राहातं. पण हे इलेक्ट्रॉनिक उपकरण वाढत्या उन्हाळ्यात वाढत्या वापरासोबत वीजबिलाही वाढवते. इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात 15 वर्षांचा अनुभव असलेले रायबरेली जिल्ह्यातील इलेक्ट्रिशियन अमित कुमार यांनी लोकल 18 ला सांगितलं की, काही गोष्टी तपासून तुम्ही पंख्यामुळे येणारं वीजबिल कमी करू शकता.
दिवस रात्र पंखा चालवूनही असं वाचे तुमचं वीजबिल..
- पंख्यांमध्ये दोन प्रकारचे रेग्युलेटर वापरले जातात. काही रेग्युलेटर विजेचा वापर मर्यादित प्रमाणात करतात, तर काही फक्त पंख्याचा वेग नियंत्रित करतात. अशा रेग्युलेटरचा विजेच्या वापराशी काहीही संबंध नसतो. त्यामुळं योग्य रेग्युलेटरचा वापर करा. काही पंखे व्होल्टेज कमी करूनही विजेचा वापर कमी करतात. पंख्यामध्ये रेग्युलेटर रेझिस्टरची भूमिका बजावतो. रेग्युलेटरवरील दोन, तीन, चार किंवा पाच सेटिंगवर पंखा चालवल्याने वीज बचतीवर कोणताही परिणाम होत नाही. यासाठी इतर गोष्टी महत्त्वाच्या असतात.
advertisement
- नेहमी 5 स्टार रेटिंग असलेले सीलिंग फॅन किंवा बीएलडीसी (BLDC) मोटर असलेले पंखे घरात वापरा. हे पंखे 50% पर्यंत कमी वीज वापरतात. गरजेनुसार पंख्याचा वेग अड्जस्ट करा. जास्त वेगामुळे जास्त वीज वापरली जाते.
- पंख्यावर धूळ साचल्याने हवेचा वेग कमी होतो आणि मोटरवर जास्त भार पडतो. यामुळे विजेचा वापर वाढतो. म्हणूनच नैसर्गिक हवा घरात येऊ द्या, त्यासाठी खिडक्या आणि दारे उघडी ठेवा. म्हणजे घरात पंखा कमी वेगातही थंड हवा देईल.
advertisement
- सकाळ आणि संध्याकाळी बाहेर फ्रेश हवा असते. त्याचा जास्तीत जास्त वापर करा. म्हणजे सकाळी घर थंड झालं की दुपारच्या वेळी पंखा कमी वेगातही जास्त थंड हवा देईल. खूप उष्णता असेल, तर कूलरसोबत पंखा चालवा. यामुळे पंखा थंड हवा सर्व घरात पोहोचवेल आणि तुमचा घर लवकर थंड होईल.
विजेचा वापर मर्यादित करण्यासाठी तुम्ही स्मार्ट स्विच किंवा टायमरचा वापर करू शकता. यामुळे जेव्हा तुम्ही एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जाल, किंवा जेव्हा कोणी नसेल तेव्हा पंख्याचा वापर टाळता येईल. शिवाय शक्य असल्यास तुम्ही सौरऊर्जेवर चालणारे पंखे वापरू शकता. यानं तर विजेची बचत निश्चित होईल.
advertisement
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि आरोग्याशी संबंधित सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून, डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच काहीही वापरा. त्याच्या वापरामुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानासाठी लोकल-18 जबाबदार राहणार नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 26, 2026 10:36 AM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Summer Tips : दिवस-रात्र पंखा चालवाल तरी येणार नाही जास्त बिल! फक्त या गोष्टी तुम्हाला माहित असाव्या..






