Bike Maintenance in Winter: हिवाळ्यात चुकूनही करू नका 'या' चुका; अन्यथा भंगारात विकावी लागेल तुमची आवडती बाईक

Last Updated:

Bike Maintenance in Winter: हिवाळ्यात जशी आपण आपल्या आरोग्याची काळजी घेतो तशीच काळजी आपल्याला आपल्या बाईकची घ्यावी लागणार आहे. जर तुम्ही योग्य पद्धतीने काळजी घेतली नाही तर रस्त्यात तुमची बाईक बंद करून तुमचा मूड ऑफ होण्याची शक्यता आहे.

प्रतिकात्मक फोटो : हिवाळ्यात ‘अशी’ घ्या तुमच्या बाईकची काळजी
प्रतिकात्मक फोटो : हिवाळ्यात ‘अशी’ घ्या तुमच्या बाईकची काळजी
मुंबई : हिवाळ्यात जशी आपण आपल्या आरोग्याची काळजी घेतो तशीच काळजी आपल्याला आपल्या कार आणि बाईकची घ्यावी लागणार आहे. जर तुम्ही तुमच्या कार किंवा बाईकची योग्य पद्धतीने काळजी घेतली नाही तर रस्त्यात तुमची कार किंवा बाईक बंद करून तुमचा मूड ऑफ होण्याची शक्यता आहे.
जाणून घेऊयात हिवाळ्यात बाईकची योग्य काळजी कशी घ्यावी ते. (Bike maintenance in winter)
हिवाळ्यात अनेकदा सकाळी कामावर जाताना बाईक किंवा स्कूटर स्टार्ट करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ती स्टार्ट होत नाही. अनेकदा स्टार्टर किंवा किकस्टार्ट बटन दाबूनही गाडी सुरू होत नाही. शेवटी बॅटरी डाऊन होते. मग किक मारण्याची वेळ येते. किक मारून मारून थंडीतही आपल्याला  घाम फुटतो पण आपली टू-व्हिलर काही सुरू होत नाही. तुमच्यासोबत पण असं झालं असेलतर खाली दिलेल्या टिप्स् वापरून आधी तुमच्या बाईकची सर्व्हिसिंग करून घ्या, जेणेकरून तुम्हाला नंतर त्रास होणार नाही.
advertisement

इंजिन ऑइल तपासा

जसं माणसाच्या शरीरात हृदय आणि रक्त असतं तसंच इंजिनला बाईकचं हृदय आणि इंजिन ऑईलला रक्त असं संबोधलं जातं. आता विचार करा जर तुमच्या शरीरात रक्ताची कमी असेल तर तुम्हाला थकवा, अशक्तपणा आणि काही आजार होण्याची भीती असते तशीच भीती इंजिन ऑईलच्या बाबतीत असते. जेव्हा हिवाळ्यात तापमान कमी होते, तेव्हा इंजिन ऑइल घट्ट होते, ज्यामुळे त्यामुळे ते पूर्णपणे इंजिनमध्ये जाऊ शकत नाही. अशा स्थितीत सतत गाडी चालू करण्याचा प्रयत्न केल्यास तुमच्या इंजिन पिस्टनला धोका पोहचू इंजिन कायमचं बंद पडू शकतं. त्यामुळे थंडीत उत्तम दर्जाचं सिंथेटिक ऑईल  वापरा. तुमच्या बाईकला इलेट्रिक स्टार्टर जरी असेल तरीही किक मारून बाईक चालू करा. बाईक चालू झाल्यानंतर थोडावेळ बाईक तशीच सुरू ठेवा मग गिअर टाकन चालवायला सुरूवात करा.
advertisement

बॅटरी

थंडीत बॅटरीची कार्यक्षमता कमी होते.त्याशिवाय वारंवार सेल्फस्टार्टचा उपयोग केल्यामुळे बॅटरी डाऊन होऊ शकते. त्यामुळे बाईकच्या सर्व्हिसिंग सोबतच बॅटरीचीही सर्व्हिसिंग करून घ्या. गरज असेल तर बॅटरीत योग्य प्रमाणात पाणी  भरून बॅटरी फुल्ल चार्ज करून घ्या. गंज लागू नये म्हणून बॅटरीच्या टर्मिनलवर ग्रीस लावा.
advertisement

पेट्रोल टँक

तुम्ही जास्त गाडी चालवत जरी नसाल आणि बाहेर जाताना तुम्हाला 100 किंवा 200 रूपयांचं पेट्रोल टाकायची सवय असेल आणि बाकीच्या वेळी तुमचा पेट्रोल टँक रिकामा रहात असेल तर तुम्हाला ही सवय बदलावी लागेल. रिकाम्या पेट्रोलटँकला गंज लागण्याची भीती असते.याशिवाय थंडीत इंजिन गरम ठेवण्यासाठी कदाचित जास्त पेट्रोलची गरज लागू शकते. त्यामुळे पेट्रोल टँक हा नेहमी भरलेला असू द्या.
advertisement

कार्बोरेटर आणि चेन

पेट्रोल आणि बॅटरीसोबत फ्युएल इंजेक्शन सिस्टमची आणि कार्बोरटर सुयोग्य स्थितीत असणं गरजेचं आहे. कार्बेरेटरमध्ये जर कचरा किंवा घाण अडकली असेल तर बाईक स्टार्ट होण्यात अडचणी येऊ शकतात. हिवाळ्यात तुम्हाला चेनची पुरेशी काळजी घेणं गरजेचं आहे. कारण थंडीमुळे ऑईल गोठून चेन तुटण्याची भीती असते. त्यामुळे थंडी दर 8 किंवा 15 दिवसांनी तुमच्या मेकॅनिककडून चेनला ग्रीस लावून किंवा ऑईलिंग करून सुस्थितीत ठेवा.
advertisement
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Bike Maintenance in Winter: हिवाळ्यात चुकूनही करू नका 'या' चुका; अन्यथा भंगारात विकावी लागेल तुमची आवडती बाईक
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement