Kumbh Mela 2025 Visitors Guide: तुम्ही महाकुंभमेळ्याला जायचा विचार करता आहात? आधी वाचा 'ही' मार्गदर्शक नियमावली

Last Updated:

Kumbh Mela 2025 Visitors Guide: जर तुम्ही महाकुंभमेळ्याला भेट देण्याचा विचार करत असाल, तर तिथे जाण्यापासून ते पोहोचल्यानंतर परतताना काय करावं आणि काय करू नये याची माहिती तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. जाणून घेऊयात कुंभमेळ्यासाठी जाताना काय करावं आणि कोणत्या गोष्टींपासून दूर रहावं.

प्रतिकात्मक फोटो : प्रयागराजमध्ये संपन्न होणारा महाकुंभ 2025
प्रतिकात्मक फोटो : प्रयागराजमध्ये संपन्न होणारा महाकुंभ 2025
मुंबई : हिंदू धर्मात कुंभमेळ्याचं प्रचंड महत्त्व आहे. दर 12 वर्षांनी महाकुंभ मेळा तर दर 6 वर्षांनी अर्धकुंभ मेळ्याचं आयोजन केलं जातं. नवीन वर्षात उत्तरप्रदेशातल्या प्रयागराजमध्ये 13 जानेवारीपासून महाकुंभ मेळ्याला सुरुवात होणार आहे. हिंदू दिनदर्शिकेनुसार, कुंभमेळ्याचं पहिलं स्नान पौष पौर्णिमा आणि शेवटचं शाही स्नान महाशिवरात्रीच्या दिवशी संपन्न होईल. फक्त देशभरातून नाही तर परदेशातूनही  लाखो लोक कुंभमेळ्याला उपस्थित राहणार आहेत. असं म्हणतात की कुंभमेळ्याच्या वेळी नदीत स्नान केल्याने व्यक्ती पापमुक्त होते आणि त्यांना मोक्षप्राप्ती होते. महाकुंभमेळ्याला उपस्थित राहणं हे प्रत्येकाला शक्य होत नाही. जर तुम्ही महाकुंभमेळ्याला भेट देण्याचा विचार करत असाल, तर तिथे जाण्यापासून ते पोहोचल्यानंतर परतताना काय करावं आणि काय करू नये याची माहिती तुमच्याकडे असणं गरजेचं आहे.
Kumbh Mela 2025 Visitors Guide तुम्ही महाकुंभमेळ्याला जायचा विचार करता आहात आधी ‘हे’ वाचा,  कुंभमेळ्यासाठी मार्गदर्शक नियमावली

जाणून घेऊयात कुंभमेळ्याची  मार्गदर्शक  तत्त्वे:

काय करावं ?

  • जर तुम्ही कुंभमेळ्याला जाणार असाल तर तिथे कोणत्या पद्धतीचं नियोजन करण्यात आलंय, कोणत्या दिवशी महत्त्वाचे स्नान आहे, राहण्याची सोय नेमकी कुठे असेल आणि कोणत्या दिवशी व्ही.व्ही.आय.पी आणि व्ही.आय.पी येणार आहेत याची माहिती करून घेण्यासाठी https://kumbh.gov.in/ या वेबसाईटवर लॉगईन करून पूर्ण माहिती घ्या किंवा मोबाईल ॲप डाऊनलोड करा.
  • प्रवासाआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या. थोड्या थोड्या तासांचा प्रवास करा. तुमची औषधं सोबत ठेवा.
  • रुग्णालये, खाद्यपदार्थांची दुकाने आणि आपत्कालीन सेवा यांची माहिती काढून ठेवा.
  • सर्व आपत्कालीन संपर्क क्रमांक तुमच्या फोनमध्ये सेव्ह करा, किंवा डायरीत त्यांची नोंद करून ठेवा.
  • ज्या स्नानांना प्रशासनाने परवानगी दिली आहे त्याच घाटांवर स्नानासाठी जा.
  • तुमच्यामुळे रस्त्यावर कुठेही घाण होणार नाही याची काळजी घ्या.
  • मेळा परिसरात उपलब्ध असलेल्या शौचालयाचा वापर करा.
  • रस्ते शोधण्यासासाठी तुमच्या मोबाईलमधल्या गुगल मॅप्सचा किंवा दिशादर्शक फलकांचा वापर करा.
  • वाहतुकीच्या नियमांचे पालन करा, तुमच्या वाहनांमुळे वाहतुकीला अडथळा होणार नाही याची काळजी घ्या. प्रशासने तयार केलेल्या जागेतच वाहनं पार्क करा.
  • जर तुम्ही मेळाक्षेत्र किंवा आजूबाजुला फिरण्याचा विचार करत असाल पूर्ण माहिती घेऊनच जा.
advertisement

या गोष्टी करणं टाळा

  • कुंभमेळ्याला हजेरी लावताना कोणत्याही मौल्यवान वस्तू, गरजेपेक्षा जास्त पैसे, अन्न आणि कपडे घेऊन जाऊ नका.
  • जेवताना किंवा अंघोळ करताना अनोळखी लोकांवर विश्वास ठेवू नका.
  • कोणत्याही वादात पडू नका.
  • नदीमध्ये स्नान करताना मर्यादीत अंतरापेक्षा जास्त दूर जाऊ नका. अंघोळ करताना साबण वापरू नका.
  • नदीमध्ये कपडे धुवू नका. किंवा निर्माल्य नदीत टाकू नका.
  • जर तुम्हाला संसर्गजन्य आजार असेल तर गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका.
  • कुंभमेळ्यात अचानक अवस्थ वाटू लागलं तर तिथे असलेल्या वैद्यकीय केंद्राला भेट देऊन त्वरित उपचार करून घ्या.
advertisement
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Kumbh Mela 2025 Visitors Guide: तुम्ही महाकुंभमेळ्याला जायचा विचार करता आहात? आधी वाचा 'ही' मार्गदर्शक नियमावली
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement