New Year Picnic: न्यू इयरला मसुरीला जाताय, ‘हे’ नवे नियम माहिती आहेत का?, या नियमांचं पालन केल्यास होईल फायदा, अन्यथा येईल पश्चातापाची वेळ
- Published by:Tushar Shete
Last Updated:
New Year Picnic: मसुरी फिरायला येणाऱ्या पर्यटकांची गैरसोय होऊ नये, त्यांना पार्किंगपासून ते शौचायलाय पर्यंतच्या सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. मात्र यासाठी त्यांना ‘या’ एका नियमाचं पालन करावं लागणार आहे. जर पर्यंटकांनी ‘या’ नियमाचं पालन केलं तर त्यांचा मसुरीचा आनंद हा द्विगुणतीच होईल.
New Year Picnic: हिवाळा सुरू होताच सगळ्यांना वेध लागतात ते नाताळच्या सुट्टीचे. ख्रिसमसची सुट्टी मिळताच अनेक जण नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी हिल स्टेशन गाठू लागतात. काश्मिर, हिमालच प्रदेश, उत्तरांखडची पिकनिक स्पॉट म्हणून निवड होते. मात्र सुट्ट्यामुळे या हिलस्टेशनवर प्रचंड गर्दी होते. अनेकदा ट्रॅफिक जॅम होतं. कित्येकदा तर पर्यंटकांचा पूर्ण दिवस या ट्रॅफिक जॅममध्ये जातो. मात्र मसुरीला येणाऱ्या पर्यंटकांचा ट्रॅफिक जॅममध्ये अडकून हिरमोड होवू नये या साठी स्थानिक प्रशासनाने कंबर कसलीये.
मसुरी प्रशासनाची जोरदार तयारी
मसुरी फिरायला येणाऱ्या पर्यटकांची गैरसोय होऊ नये, त्यांना पार्किंगपासून ते शौचायलाया पर्यंतच्या सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. मात्र यासाठी त्यांना ‘या’ एका नियमाचं पालन करावं लागणार आहे. जर पर्यंटकांनी ‘या’ नियमाचं पालन केलं तर त्यांचा मसुरीचा आनंद हा द्विगुणीतच होईल.

देहरादूनचे जिल्हाधिकारी सविन बन्सल
advertisement
पर्यटकांसाठी शटल सेवा
इअरएंडला मसुरीला येणाऱ्या पर्यटकांना वाहतूक कोंडीचा त्रास होऊ नये यासाठी प्रशानासने सॅटेलाईट पार्किंग प्रकल्प उभारायला सुरूवात केलीये. एकाच ठिकाणी वाहनांची कोंडी होऊ म्हणून शटलसेवा सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतल्याची माहिती जिल्हाधिकारी सविन बन्सल यांनी दिलीये. बन्सल म्हणाले की, ‘असं नाहीये की वाहतूक कोंडीमुळे फक्त पर्यंटकांचाच मूड ऑफ होतो, वाहतूक कोंडीचा फटका स्थानिकांना सुद्धा बसत असतो. त्यामुळे मसुरीत येणाऱ्या पर्यंटकांची वाहतूक कोंडीपासून सुटका करण्यासाठी सॅटेलाईट पार्किंग आणि शटलसेवा सुरू करण्याचा निर्णय आम्ही घेतलाय. एकाच वेळी जास्त संख्येने आलेल्या पर्यंटकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. याशिवाय पार्कींगची समस्या ही असतेच. त्यामुळेच आम्ही हा निर्णय घेतलाय जेणेकरून त्यांचं मसुरीतलं वास्तव्य आनंददायी होईल.
advertisement
काय आहे सॅटेलाईट पार्किंग ?
सॅटेलाईट पार्किंगमुळे वाहनांना विशिष्ट अंतरावर आणि त्यांच्या इच्छितस्थळी पोहोचण्याचा सोपा सांगितला जाईल. 15 डिसेंबरपर्यंत एलिफंट पार्क आणि किंगक्रेग सॅटेलाईट पार्किंग पूर्णपणे तयार होईल. पर्यटकांना कोणत्याही गैरसोयीला सामोरे जावे लागू नये यासाठी शौचालये, कॅन्टीन, प्रकाशयोजना,मार्गदर्शक चिन्हे आणि कमीत कमी वेळात तिकिट मिळण्याची सोय केली जाईल. पार्किंगपासून इच्छितस्थळी पोहोचण्यासाठी मॉल रोडवर गोल्फ कार चालवण्याचं नियोजीत आहे. किंगक्रेग आणि हाथीपाव या 6ते 7 किलोमीटरच्या रस्त्यावर 800-900 वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्हा दंडाधिकारी सविन बन्सल यांनी सांगितले की, 'शटलसेवेचं काम शक्य तितक्या लवकर पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. शटलसेवेचा स्थानिकांना फायदा व्हाया यासाठी किंगक्रेग टॅक्सी असोसिएशनची निवड करण्यात आली आहे. किंगक्रेग पार्किंग ते लायब्ररी चौक (250-350 रुपये), किंगक्रेग पार्किंग ते पिक्चर पॅलेस (250-350 रुपये), हाथी पाव ते लायब्ररी चौक (300-450 रुपये) आणि हाथी पाव ते पिक्चर पॅलेस (300-450 रुपये) असे दर निश्चित करण्यात आले आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 08, 2024 5:52 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
New Year Picnic: न्यू इयरला मसुरीला जाताय, ‘हे’ नवे नियम माहिती आहेत का?, या नियमांचं पालन केल्यास होईल फायदा, अन्यथा येईल पश्चातापाची वेळ