Stomach pain home remedies: असह्य पोटदुखी, गॅसेसचा त्रास होतेय? वापरा ‘या’ घरगुती टिप्स् पोटदुखी, अपचन जाईल पळून

Last Updated:

Stomach pain home remedies: तुम्ही घरात एकटे असताना जर अचानक पोटदुखीचा त्रास सुरू झाला तर घाबरून जाण्याची गरज नाहीये. या 4 घरगुती टिप्स वापरून तुम्ही गॅसेस आणि अपचनाच्या समस्येवर उपाय करू शकता.

प्रतिकात्मक फोटो : गॅसेस, पोटदुखीचा त्रास होतेय? करा ‘हे’ घरगुती उपाय
प्रतिकात्मक फोटो : गॅसेस, पोटदुखीचा त्रास होतेय? करा ‘हे’ घरगुती उपाय
मुंबई: असं म्हणतात एखाद्या आजाराला काही ठराविक कारण असू शकतं. मात्र पोटदुखीसाठी एक नाही तर अनेक कारणं कारणीभूत ठरू शकतात. कारण आपण काहीही खाल्लं, प्यायलो इतकंच काय तर श्वास जरी घेतला तरीही त्याचा थेट परिणाम पोटावर होऊन पोटदुखीच्या आजारांना निमंत्रण मिळू शकतं. गॅसेस आणि ॲसिडिटी या पोटदुखीच्या प्रातिनिधिक समस्या. मात्र तुम्ही घरात एकटे असताना जर अचानक पोटदुखीचा त्रास सुरू झाला तर ? घाबरून जाण्याची गरज नाहीये.

पोटदुखीवर आज आम्ही घेऊन आलोत 1 नाही, 2 नाही तर तब्बल 4 घरगुती रामबाण उपाय.

ओवा आणि सैंधव मीठ

ओवा आणि काळं किंवा सैंधव मीठ पोटदुखीवर सर्वात प्रभावी घरगुती उपायांपैकी एक आहे. तव्यावर एक चमचा ओवा टाकून तो हलका भाजून घ्या. त्यात चिमूटभर काळं मीठ घाला. यानंतर कोमट पाण्यासोबत भाजलेला ओवा आणि सैंधव मिठाचं सेवन करा. या उपायाने गॅस आणि अपचनामुळे होणाऱ्या वेदनांपासून त्वरित आराम मिळेल. याशिवाय पाचक रस सक्रिय व्हायला मदत होऊन पचनक्रिया मजबूत व्हायला मदत होईल.
advertisement

आलं आणि मध

आल्यामध्ये दाहक-विरोधी गुणधर्मा असतात. त्यामुळे जळजळ आणि दुखण्यावर आलं एक चांगला पर्याय ठरू शकतं. पोटदुखीवर आल्याचा वापर फायदेशीर ठरतो. थोडंस ताजं आलं किसून घ्या. त्यात एक चमचा मध टाका. व्यवस्थित मिसळून खाल्ल्यामुळे थोड्याच वेळात पोटदुखी पासून आराम मिळेल. याशिवाय गॅसेसचा त्रास होत असेल तर तो ही  कमी व्हायला मदत होईल.
advertisement

हिंग आणि पाणी

पोटदुखीवर हिंग हा सर्वोत्तम घरगुती उपाय मानला जातो. आजीबाईच्या बटव्यातला हा एक सोपा उपाय आहे. जेव्हा लहान मुलाचं पोटं दुखतं तेव्हा त्यांच्या बेंबीवर हिंगपाणी टाकल्याने आराम मिळतो हे आपल्या सर्वांना माहिती आहे. मात्र गॅसेस आणि पोटदुखीच्या आजारावर हिंगपाण्याचा वापर कोणत्याही वयोगटातली व्यक्ती करू शकते. हिंग पाण्यात मिसळून लावल्याने किंवा खाल्ल्याने केल्याने गॅस आणि पोटदुखीपासून आराम मिळतो. एक ग्लास कोमट पाण्यात चिमूटभर हिंग मिसळून प्यायल्याने अपचन आणि पोटातला जडपणा कमी होतो
advertisement

पुदिना आणि लिंबाचा रस

पुदिन्याचा रस पोटदुखी आणि गॅसेसच्या त्रासवर एक चांगला उपाय आहे. पुदिन्याची पानं बारीक कापून त्यांचा रस काढा. त्यावर लिंबू पिळून घ्या. कोमट पाण्यासोबत आलं पुदिन्याचा सर गुणकारी ठरू शकतो. यामुळे पोटाला थंडावा मिळतो आणि गॅसची समस्याही दूर होते.
घरगुती उपाय केवळ प्रभावीच नाहीत तर कोणत्याही दुष्परिणामांशिवाय पोटदुखीपासून आराम देतात. मात्र, पोटदुखी दीर्घकाळ राहिल्यास किंवा दुखण्याचे कारण स्पष्ट होत नसल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यायला विसरू नका.
advertisement
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Stomach pain home remedies: असह्य पोटदुखी, गॅसेसचा त्रास होतेय? वापरा ‘या’ घरगुती टिप्स् पोटदुखी, अपचन जाईल पळून
Next Article
advertisement
OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement