ब्रिटिश पीएम Good News घेऊन भारतात आले! लक्झरी दारू स्वस्त होणार, Johnnie Walker Whisky निम्म्या किमतीत
- Published by:Priya Lad
Last Updated:
UK PM Keir Starmer in India johnnie walker whisky get cheaper : ब्रिटनचे पंतप्रधान केयर स्टारमर बुधवारपासून दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. या भेटीदरम्यान भारत-ब्रिटन मुक्त व्यापार करारावरही चर्चा केली जाईल. ब्रिटिश पीएमच्या भारत भेटीचा सर्वाधिक फायदा म्हणजे लक्झरी सिंबल समजला जाणारा दारू ब्रँड जॉनी वॉकर आता स्वस्त होणार आहे.
नवी दिल्ली : जॉनी वॉकर ही जगातील सर्वात प्रिय स्कॉच व्हिस्की आहे. ही व्हिस्की एक लक्झरी सिम्बल आहे. ही दारू इतकी महाग आहे की त्याच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत. पण आता मात्र हा लक्झरी ब्रँड निम्म्या किमतीत मिळणार आहे. जॉनी वॉकर लवकरच स्वस्त होणार आहे.
जॉनी वॉकर, चिवास रीगल, ग्लेनफिडिच, सिंगलटन, टॅलिस्कर, ग्लेनमारंगी, ग्रँट्स आणि जुरा हे ब्रिटिश व्हिस्की ब्रँड भारतात खूप लोकप्रिय आहेत. भारतात या व्हिस्कीवरील 150% कर दरामुळे त्यांची किंमत जास्त आणि सामान्य व्यक्तीच्या आवाक्याबाहेर राहिली आहे. पण आता भारत आणि यूकेमध्ये मुक्त व्यापार करार (FTA) झाला आहे.
advertisement
या वर्षी जुलैमध्ये भारत आणि ब्रिटनमध्ये FTA वर स्वाक्षरी झाली होती. आता ब्रिटनचे पंतप्रधान केयर स्टारमर बुधवारपासून दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. या भेटीदरम्यान भारत-ब्रिटन मुक्त व्यापार करारावरही चर्चा केली जाईल. ब्रिटिश पीएमच्या भारत भेटीचा सर्वाधिक फायदा म्हणजे लक्झरी सिंबल समजला जाणारा दारू ब्रँड जॉनी वॉकर आता स्वस्त होणार आहे.
advertisement
एफटीए हा मूलतः दोन देशांमधील व्यापार सुलभ करण्यासाठी केलेला करार आहे. या करारांतर्गत, दोन्ही देश एकमेकांच्या उत्पादनांवरील आयात शुल्क, शुल्क किंवा कर कमी करतात किंवा काढून टाकतात. भारत आणि यूकेतील या कराराअंतर्गत ब्रिटनमध्ये निर्यात होणाऱ्या 99% भारतीय उत्पादनांवर करमुक्तता येईल. यामुळे ब्रिटनमध्ये भारतीय वस्तू स्वस्त होतील. त्याच वेळ 90% ब्रिटिश वस्तूंवरील कर कमी केले जातील. स्कॉच व्हिस्की आणि जिनवरील आयात शुल्क 150% वरून 75% पर्यंत कमी केलं जाईल. ज्यामुळे ब्रिटनमधून भारतात आयात होणाऱ्या स्कॉच व्हिस्कीची किंमत कमी होईल.
advertisement
भारतातील जॉनी वॉकरच्या 750 मिलीलीटर बाटलीची अंदाजे किंमत
रेड लेबल : 1,700 ते 2,200 रुपये
ब्लैक लेबल : 3,310 ते 3,800 रुपये
ग्रीन लेबल : 4,100 ते 5,200 रुपये
डबल ब्लॅक लेबल : 3,200 ते 5,400 रुपये
गोल्ड लेबल रिजर्व : 7,650 ते 8,250 रुपये
advertisement
प्लॅटिनम लेबल/ जॉनी वॉकर 18 ईयर ओल्ड : 7,865 ते 11,450 रुपये
ब्लू लेबल : 31,760 ते 35,000 रुपये
Location :
Delhi
First Published :
October 08, 2025 2:27 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
ब्रिटिश पीएम Good News घेऊन भारतात आले! लक्झरी दारू स्वस्त होणार, Johnnie Walker Whisky निम्म्या किमतीत