Healh Tip : कोणत्या तेलात स्वयंपाक केल्याने वजन कमी होऊ शकतं? हे आरोग्यदायी पर्याय गृहिणींना माहित असायलाच पाहिजेत

Last Updated:

जर वजन कमी करायचं असेल, तर वापरणाऱ्या तेलाची निवड योग्य असणं खूप गरजेचं आहे.

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
मुंबई : स्वयंपाकासाठी कोणतं तेल वापराता? याचा आपल्या आरोग्यावर थेट परिणाम होतो. त्यामुळेच अनेक गृहिणी आरोग्यासाठी चांगल्या तेलाच्या शोधात असतात. पण प्रत्येक कंपनी आपलं तेल कसं चांगलं आहे हे नेहमी जाहिरातींच्या माध्यमातून सांगतात त्यामुळे योग्य तेल निवडणे नेहमीच कन्फ्यूजिंग असतं.
विशेषतः जर वजन कमी करायचं असेल, तर वापरणाऱ्या तेलाची निवड योग्य असणं खूप गरजेचं आहे. आज घरातील बहुतांश गृहिणी तूप किंवा रिफाइंड तेलांचा वापर करतात. पण काही विशिष्ट तेलं अशी आहेत, जी तुमचं जेवण चविष्ट ठेवतात आणि वजनही वाढू देत नाहीत.
वजन कमी करण्यासाठी सर्वोत्तम तेल कोणतं?
ऑलिव्ह ऑईल (जैतून तेल)
हे तेल मोनो-अनसॅच्युरेटेड फॅट्स ने भरलेलं असतं, जे हृदयासाठी आणि शरीराच्या फॅट बर्निंग प्रक्रियेसाठी फायदेशीर आहे. वजन कमी करण्यासाठी हे एक उत्तम पर्याय आहे, विशेषतः सॅलड ड्रेसिंग किंवा हलकं शिजवण्यासाठी हे योग्य आहे.
advertisement
नारळ तेल
यामध्ये मीडियम चेन ट्रायग्लिसराइड्स (MCTs) असतात, जे शरीरात लगेच एनर्जीमध्ये रूपांतरित होतात आणि चरबी साठण्याची शक्यता कमी करतात. त्यामुळे मध्यम प्रमाणात नारळ तेलाचाही वापर फायदेशीर ठरतो.
शेंगदाण्याचं तेल
यात भरपूर अँटीऑक्सिडंट्स असतात. कमी तापमानावर शिजवताना याचा वापर केल्यास चवही टिकते आणि आरोग्यही सांभाळता येतं.
लक्षात ठेवा:
तेल कितीही चांगलं असलं, तरी ते मर्यादित प्रमाणात वापरणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. एका प्रकारचं तेल सतत न वापरता, वेगवेगळ्या हेल्दी तेलांचा संतुलित वापर अधिक फायदेशीर ठरतो.
advertisement
गृहिणींसाठी टिप: घरच्या स्वयंपाकात हलक्या तापमानावर शिजणारे पदार्थ ऑलिव्ह ऑईल मध्ये करा, आणि तळणीसाठी नारळ तेल किंवा गायीचं साजूक तूप वापरा.
(नोट : वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहे, न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही, आमचा उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Healh Tip : कोणत्या तेलात स्वयंपाक केल्याने वजन कमी होऊ शकतं? हे आरोग्यदायी पर्याय गृहिणींना माहित असायलाच पाहिजेत
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement