Kitchen Tips : तेल न वापरता तळू शकता पापड-चिप्स, प्रसिद्ध शेफ पंकजने सांगितली अनोखी ट्रिक..
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
खिचडीसोबत पापड असेल तर चव दुप्पट वाढते. बऱ्याचदा लोक स्नॅक्स म्हणून भरपूर तेलात तळलेले कडाकड्या आणि बटाट्याच्या चिप्स खातात. मात्र, जास्त तेलात तळलेले पदार्थ खाल्ल्याने एकूण आरोग्यावर वाईट परिणाम होतो.
मुंबई : तळलेले पदार्थ खायला सर्वांना आवडतं. घरात खिचडी वगैरे केले की त्यासोबत पापड आवर्जून तळले जातात. कारण खिचडीसोबत पापड असेल तर चव दुप्पट वाढते. बऱ्याचदा लोक स्नॅक्स म्हणून भरपूर तेलात तळलेले कडाकड्या आणि बटाट्याच्या चिप्स खातात. मात्र, जास्त तेलात तळलेले पदार्थ खाल्ल्याने एकूण आरोग्यावर वाईट परिणाम होतो.
अशा परिस्थितीत आपण पापड तेलात न तळता कसे खाऊ शकतो हे जाणून घेऊया. प्रसिद्ध मास्टर शेफ पंकज भदौरिया यांनी याबाबत एक उत्तम युक्ती शेअर केली आहे. शेफ पंकजने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली असून तेलाशिवाय पापड तयार करण्याची एक उत्तम युक्ती त्यांनी सुचवली आहे. चला त्या युक्तीबद्दल जाणून घेऊया.
advertisement
पापड आणि चिप्स तेलाशिवाय कसे तळायचे?
शेफ पंकज भदौरिया यांनी पापड तळण्याची ही युक्ती अतिशय सोपी आणि मनोरंजक आहे. यासाठी पापड आणि चिप्स व्यतिरिक्त तुमच्या घरात मीठ असणे आवश्यक आहे. होय, मीठ. कारण या युक्तीमध्ये तुम्हाला पापड तेलात नाही तर मीठात भाजायचे आहेत. तेलात पापड डीप फ्राय करण्याची गरज नाही. शेफ पंकजच्या या व्हिडिओला एक लाख 35 हजार लाईक्स मिळाले आहेत.
advertisement
शेफ पंकजने सांगितलेल्या युक्तीनुसार, सर्व प्रथम गॅसवर तवा ठेवा. त्यात भरपूर मीठ घाला. मिठचांगले गरम झाल्यावर गॅस मंद करा आणि त्यात एक पापड घाला आणि त्यावर मीठ टाकत टाकत ते व्यवस्थित भाजून घ्या. त्याचप्रमाणे चिप्स आणि इतर गोष्टी मीठात भाजू शकतात. शेफच्या या ट्रिकवर लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या आहेत. हा व्हिडिओ अनेक वेळा शेअर करण्यात आला आहे, लाखो लोकांनी तो पाहिला आहे.
advertisement
advertisement
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणतीही कृती करण्यापूर्वी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
April 30, 2024 1:53 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Kitchen Tips : तेल न वापरता तळू शकता पापड-चिप्स, प्रसिद्ध शेफ पंकजने सांगितली अनोखी ट्रिक..