Leg Cramp : पायात सारखे क्रॅम्प येतात? किरकोळ म्हणून दुर्लक्ष नका करू; असू शकतो हा गंभीर आजार
- Published by:Pooja Jagtap
- trending desk
Last Updated:
पायाच्या पोटरीच्या भागात दुखतं, तो भाग कडक होतो आणि स्नायू जागेवरून थोडे मागे-पुढे सरकतात. याला काफ मसल्स म्हणतात. गोळा फक्त एक ते दीड मिनिटासाठी येतो.
मुंबई : आपल्या शरीरात अशा अनेक समस्या असतात, ज्यामुळे लगेच वेदना होत नाहीत; पण त्यांकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यात गंभीर आजार होऊ शकतात. आपल्यापैकी अनेकांना पायात क्रॅम्प (गोळे) येतात. म्हणजेच पायाच्या पोटरीच्या भागात दुखतं, तो भाग कडक होतो आणि स्नायू जागेवरून थोडे मागे-पुढे सरकतात. याला काफ मसल्स म्हणतात. गोळा फक्त एक ते दीड मिनिटासाठी येतो. परंतु तेव्हा इतकं दुखतं की करंटचा झटका बसल्यासारखं वाटतं. हे सहसा रात्री उशिरा किंवा पहाटे 4 ते 5 च्या सुमारास होतं. दीड मिनिटानंतर स्नायू आपल्या जागी परततात आणि दुखणंही थांबतं. याचा तुम्हाला खूप त्रास होत असेल तर भविष्यात किडनी निकामी होऊ शकते. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करू नका आणि ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. आज आपण पायात क्रॅम्प येण्याची कारणं, त्यामुळे होऊ शकणारे गंभीर आजार व उपाय याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.
पायात क्रॅम्प येण्याची कारणं
मायो क्लिनिकच्या माहितीनुसार, बऱ्याच प्रकरणांमध्ये लेग क्रॅम्पचं कारण कळत नाही. हे मसल्स आणि नर्व्हच्या समस्यांमुळे येऊ शकतात. वयानुसार पायात क्रॅम्प येण्याची समस्या वाढते. गर्भवती महिलांना या समस्येचा अधिक सामना करावा लागतो. याशिवाय काही जण अशी औषधं घेतात, की ज्यामुळे रात्री जास्त लघवी होते. यामुळे रात्री पायात क्रॅम्प येऊ शकतात; पण काही वेळा पायांच्या क्रॅम्पची कारणं गंभीर असू शकतात. किडनी फेल्युअर किंवा सिऱ्हॉसिसमुळेदेखील असं होऊ शकतं. चुकीची लाइफस्टाइल, खूप व्यायाम, बसण्याची चुकीची पद्धत, खूप वेळ उभं राहणं, नर्व्हच्या समस्याही यास कारणीभूत असू शकतात.
advertisement
इतर कारणं
1. अॅक्युट किडनी फेल्युअर
2. अॅडिसन डिसीज
3. अल्कोहोल डिसऑर्डर
4. हिमोग्लोबिनची कमतरता
5. क्रॉनिक किडनी डिसीज
6. सिऱ्हॉसिस
7. डीहायड्रेशन
8. हाय ब्लड प्रेशर
9. हायपोग्लायसेमिया
10. हायपोथायरॉइड
11. खराब लाइफस्टाइल
12. ब्लड प्रेशर, कोलेस्टेरॉलची औषधं
13. पार्किन्सन्स डिसीज
आराम कसा मिळवायचा
पायातले क्रॅम्प एक किंवा दोन मिनिटांत आपोआप बरे होतात; पण मसाज किंवा स्ट्रेच केल्यास ते लवकर बरे होतात. जेव्हा जेव्हा तुमच्या पायात क्रॅम्प येतात आणि खूप वेदना होतात तेव्हा काही काळ हिल्सवर किंवा तळव्यांवर प्रेशर देऊन चाला. यामुळे आराम पडेल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 11, 2024 10:02 AM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Leg Cramp : पायात सारखे क्रॅम्प येतात? किरकोळ म्हणून दुर्लक्ष नका करू; असू शकतो हा गंभीर आजार