फ्रेंडशिप डे निमित्त बाजारपेठे सजली, पाहा यंदा काय आहे ट्रेण्ड?
- Published by:News18 Lokmat
Last Updated:
ऑगस्ट महिना सुरू झाला की 'फ्रेंडशिप डे'चे वेध लागतात. पाहा यंदा काय आहे मैत्री दिनाचा ट्रेंड..
मुंबई, 6 ऑगस्ट: मैत्री म्हणजे जीवाला जीव देणं , मैत्री म्हणजे धम्माल. म्हणूनच 'हर एक फ्रेंड जरुरी होता है ' यार! आजच्या यंगिस्तानमधली दोस्ती की ये दास्तान. तरुणाईचा लाडका फ्रेंडशिप डे सुरू झाला आहे. त्यामुळे फ्रेंडशिप बँड्स, छोटी-मोठी गिफ्ट आर्टिकल्स , ग्रीटिंग कार्डस यांनी दुकानं सजलेली दिसत आहेत. चला तर जाणून घेऊया यंदा काय स्पेशल आहे?
ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी तरुणाई फ्रेंडशिप डे साजरा करते. शाळेपासून ते महाविद्यालयातील तरुण-तरुणी आपली मैत्री किती घट्ट आहे हे या दिवशी दाखवण्याचा वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करत असतात. मात्र या सर्वांमध्ये या दिवशी फ्रेंडशिप बँड बांधून ही तरुणाई हा दिवस साजरा करत असते. तसेच विविध ग्रीटिंग कार्ड्स हे याच दिवशी आपल्या मित्रमंडळींना दिले जातात.
advertisement
फ्रेंडशिप डे साठी बाजार सज्ज
कॉलेजमधून बाहेर पडलं की जवळपास प्रत्येकजण या दुकानांकडे धाव घेताना दिसतोय. कॅम्पसमध्ये, कट्ट्यावर, कॅन्टीनमध्ये चहाचे घुटके घेताना 'फ्रेंडशिप डे' साजरा केला जातो. फ्रेंडशिप डे निमित्त विविध प्रकारचे पन्नास रूपयांपासून ते हजार रूपयांपर्यंतचे गिफ्ट बाजारात आलेत. फ्रेंडशिप बँड, फोटो फ्रेम, टेडीबेअर, मैत्रीचे संदेश देणारी विविध आकारातील रंगीबेरंगी शुभेच्छापत्रे उपलब्ध आहेत.
advertisement
5 रुपयांपासून मिळतात गिफ्ट
स्टॅंडर्ड गिफ्ट अँड आर्टचे दुकानदार हर्ष पटेल सांगतात की, दरवर्षी फ्रेंडशिप डे निमित्त आमच्या दुकानात विविध गोष्टी उपलब्ध असतात. अवघ्या पाच रुपयांपासून ते दोनशे रुपये पर्यंत फ्रेंडशिप बँड देखील ट्रेंडनुसार आमच्याकडे पाहायला मिळतात. तसेच या दिनानिमित्त विविध गिफ्ट कार्ड गिफ्ट देखील स्वस्त दरात उपलब्ध आहे. ग्रीटिंग : 60 ते 200 पर्यंत, फ्रेंडशिप बँड: 5 रू. ते 150 रू, फोटो फ्रेम : 350 ते 2000 रू., टायमर्स : 350 ते 500रू, टेडी बेअर : 350 ते 2000रू. , गिफ्ट : 200 ते 1000 रू., मूर्ती : 195 ते 4000 रू., परफ्यूम : 199 ते 2000 रु. इतकी किंमत आहे. यंदाच्या फ्रेंडशिप डे निमित्त बाजारपेठेत विविध आकर्षक अशा गोष्टी आल्या असून ग्राहकांची मोठ्या प्रमाणात मागणी देखील आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 06, 2023 9:29 AM IST