advertisement

लाडक्या भाऊरायाला पाठवा राखी, डाक विभागाने केली आहे खास व्यवस्था!

Last Updated:

भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याचा सण आणखीन खास करण्यासाठी पोस्ट विभागाने वॉटर प्रूफ कव्हरची सुविधा केली आहे. या कव्हरमुळे पावसापाण्यात बहिणींनी भावांसाठी पाठवलेल्या राख्या ओल्या होणार नाहीत.

लाडक्या भाऊरायाला पाठवा राखी, डाक विभागाने केली आहे खास व्यवस्था!
लाडक्या भाऊरायाला पाठवा राखी, डाक विभागाने केली आहे खास व्यवस्था!
हल्द्वानी, 5 ऑगस्ट :  यंदा 31 ऑगस्टला रक्षाबंधनाचा सण साजरा केला जाणार आहे. यानिमित्ताने अनेक बहिणी त्यांच्या भावाला पोस्टाने राखी पाठवत असतात. पोस्ट विभागाच्या चांगल्या सुविधांमुळे दरवर्षी पोस्टाने राखी पाठवण्याच्या संख्येत मोठी वाढ होत असते. तेव्हा भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याचा सण आणखीन खास करण्यासाठी पोस्ट विभागाने वॉटर प्रूफ कव्हरची सुविधा केली आहे. या कव्हरमुळे पावसापाण्यात बहिणींनी भावांसाठी पाठवलेल्या राख्या ओल्या होणार नाहीत.
रक्षाबंधनाच्या सणाच्या दिवशी बहिणींना पावसाळ्यात सुरक्षितपणे आपल्या भावाला राखी पाठवता यावी यासाठी भारत सरकारकडून विशेष जलरोधक लिफाफे मुख्य पोस्ट ऑफिसला पाठवण्यात आले आहेत. या विशेष पाकिटासाठी टपाल विभाग केवळ दहा रुपये आकारत आहे. तसेच या वॉटरप्रूफ लिफाफ्यासह राखी पाठवण्यासाठी कोणतेही अतिरिक्त पैसे आकारले जात नाहीत. म्हणजे बहीण फक्त 10 रुपये खर्चून आपल्या भावांना सुरक्षितपणे राखी पाठवू शकते.
advertisement
लिफाफ्याद्वारे रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या जातात. वॉटरप्रूफ कव्हरच्या वरच्या डाव्या बाजूला इंडिया पोस्टचा लोगो आणि रक्षाबंधन डिझाइनसह इंग्रजीमध्ये राखी कव्हर आणि उजव्या बाजूला 'हॅपी राखी' लिहिलेले आहे. राखीच्या कव्हरवर बेटी बचाओ, बेटी पढाओचा संदेशही लिहिलेला आहे.
हल्दवानी पोस्ट ऑफिसचे पोस्टमास्टर गौरव जोशी यांनी सांगितले की, हे डिझायनर राखी कव्हर वॉटरप्रूफ आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने मजबूत आहेत. लिफाफ्यांच्या मदतीने बहिणी आपल्या भावांना देश-विदेशात राखी पाठवू शकतात. त्यामुळे पावसाळ्यातही बहिणींच्या राख्या दूरवर राहणाऱ्या भावांपर्यंत सुखरूप पोहोचू शकतील. या राखी कव्हरची किंमत फक्त 10 रुपये आहे.
view comments
मराठी बातम्या/देश/
लाडक्या भाऊरायाला पाठवा राखी, डाक विभागाने केली आहे खास व्यवस्था!
Next Article
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार, चालून आला गोल्डन चान्स
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार
  • गुंतवणूकदारांसाठी सर्वात मोठा जॅकपॉट

  • LIC आणि SBI कडून होणार शेअर्स विक्री

  • तुमचा वाटा मिळवण्यासाठी आतापासूनच प्लॅन करा

View All
advertisement