शिवप्रेमींसाठी हक्काचे ठिकाण, घडेल शिवरायांची प्रचिती, मुंबईतील या ठिकाणाला नक्की भेट द्या
- Reported by:Nikita Tiwari
- Published by:Mohan Najan
Last Updated:
मुंबईचे दोन भाऊ निमित पांचाळ आणि प्रतिश पांचाळ हे दोघेही महाराजांची शौर्यगाथा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. नुकतेच या भावांनी एकत्र येऊन मुंबईच्या जोगेश्वरीमध्ये शिवराया नावाचे किल्ल्याच्या सजावटीचे शिवप्रेमींसाठी एक हक्काचे ठिकाण सुरू केले आहे.
निकिता तिवारी, प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पराक्रम प्रत्येक मराठी माणूस तसेच प्रत्येक भारतीयापर्यंत पोहोचावा यासाठी अनेक जण कार्यरत आहेत. गुजराती कुटुंबातील मुंबईचे दोन भाऊ निमित पांचाळ आणि प्रतिश पांचाळ हे दोघेही महाराजांची शौर्यगाथा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. नुकतेच या भावांनी एकत्र येऊन मुंबईच्या जोगेश्वरीमध्ये शिवराया नावाचे किल्ल्याच्या सजावटीचे शिवप्रेमींसाठी एक हक्काचे ठिकाण सुरू केले आहे.
advertisement
या ठिकाणी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी माहिती देणारी विविध पुस्तके, लहान मुलांसाठी मावळ्यांचे वेगवेगळे पझल, महाराष्ट्रातील गड किल्ल्यांची माहिती देणारी पुस्तके मिळतील. तसेच वेगवेगळे कस्टमाईज केलेले महाराजांच्या नावाचे पेन, दिनदर्शिका, फोटो फ्रेम, वाघ नखे, छोट्या आकाराच्या तलवारी, जिरेटोप, चारचाकी गाडीमध्ये लावता येतात अशा मावळ्यांच्या प्रतिकृती विकत मिळतील.
advertisement
लोकल 18 शी बोलताना पांचाळ म्हणाले की, आम्ही आमच्या व्यवसायाला विस्तारण्याच्या विचारात होतो. तेव्हा आमच्याकडे जोगेश्वरी पूर्वची ही जागा एक पर्याय म्हणून होती. पण या जागेवर नेमकं काय करायचं असा विचार माझ्या आणि भावाच्या डोक्यात होता. नंतर आम्हाला आमच्या दुकानात समोरच छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती दिसली. तेव्हा आम्ही विचार केला की महाराज यांच्याशी निगडित वेगवेगळ्या माहिती पूर्ण वस्तू विकत मिळेल असे मुंबईमध्ये कोणतेही ठिकाण नाही आहे. तर आपणच याची सुरुवात करावी आणि शिवराया नावाच्या दुकानाची सुरुवात झाली.
advertisement
छत्रपती शिवाजी महाराज यांची माहिती देणारी पुस्तके, छोट्या छोट्या तलवारी, खंजीर, फ्रेम्स, मूर्ती, आकर्षक चित्र, सिंहासन या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे विकत मिळतील. तुम्हाला जर एखाद्याला छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी निगडित भेटवस्तू द्यायची असेल तर शिवराया हे दुकान एक उत्तम ठिकाण आहे. जिथे तुम्हाला महाराजांच्या एकूण एक वस्तू मिळून जातील. दोन गुजराती भावांनी सुरू केलेल्या शिवराया या जोगेश्वरी पूर्व येथील दुकानाला नक्की भेट द्या.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 20, 2025 8:56 AM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
शिवप्रेमींसाठी हक्काचे ठिकाण, घडेल शिवरायांची प्रचिती, मुंबईतील या ठिकाणाला नक्की भेट द्या








