Rakshabandhan 2024: रक्षाबंधनात चांदीच्या राख्यांचा ट्रेंड; कस्टमाईज डिझाईन्समुळे वाढली मागणी, दर काय?

Last Updated:

Rakshabandhan 2024: चांदीच्या राख्या फक्त एक दिवसाच्या वापरासाठी नसतात. त्यांची खासियत म्हणजे त्या टिकाऊ असतात आणि आठवणी म्हणून दीर्घकाळ जपल्या जाऊ शकतात.

+
Rakshabandhan

Rakshabandhan 2024: रक्षाबंधनात चांदीच्या राख्यांचा ट्रेंड; कस्टमाईज डिझाईन्समुळे वाढली मागणी, दर काय?

मुंबई : श्रावण महिन्यातील नागपंचमीनंतरचा सर्वात मोठा आणि सगळ्यांना उत्सुकता असलेला सण म्हणजे रक्षाबंधन. यंदा हा सण 9 ऑगस्ट 2025 रोजी, शनिवारी साजरा होणार आहे. या दिवसासाठी शहरातील बाजारपेठा, मॉल्स आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स रंगीबेरंगी राख्यांनी सजले आहेत. पारंपरिक रेशीम, फॅन्सी, कार्टून, ट्रेंडी, स्टोनवर्क अशा असंख्य डिझाईन्स उपलब्ध आहेत. मात्र, यावर्षी सर्वाधिक चर्चा आणि लक्ष वेधून घेत असलेला प्रकार म्हणजे चांदीची राखी.
टिकाऊ आणि आकर्षक
चांदीच्या राख्या फक्त एक दिवसाच्या वापरासाठी नसतात. त्यांची खासियत म्हणजे त्या टिकाऊ असतात आणि आठवणी म्हणून दीर्घकाळ जपल्या जाऊ शकतात. बहिणी आपल्या भावाला केवळ राखीच नव्हे, तर एक अशी भेट देतात जी वर्षानुवर्षे त्याच्याकडे राहते. त्यामुळेच या राख्यांचा भावनिक आणि आर्थिक दोन्ही दृष्टिकोनातून महत्त्व वाढले आहे.
advertisement
डिझाईन्समध्ये वैविध्य
या राख्यांमध्ये विविध प्रकारच्या नाजूक आणि सुंदर डिझाईन्स उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे, या राख्यांवर श्रीराम, श्रीकृष्ण, ओम, स्वस्तिक, शिवशंकर यांसारखी धार्मिक प्रतीके कोरण्याचा पर्याय असतो. एवढंच नाही तर, तुम्हाला हवे असल्यास राखीवर भावाचे नाव, खास मेसेज किंवा निवडक चिन्ह देखील कोरता येते. त्यामुळे या राख्या पूर्णपणे कस्टमाईज करता येतात.
advertisement
खिशाला परवडणारी किंमत
चांदी म्हटली की किंमत जास्त असेल असे वाटते, पण या राख्या खिशाला परवडतील अशा किमतीत उपलब्ध आहेत. बाजारात त्यांची किंमत साधारण 300 रुपयांपासून 1500 रुपयांपर्यंत आहे. त्यामुळे सामान्य कुटुंबांपासून प्रीमियम गिफ्ट निवडणाऱ्या ग्राहकांपर्यंत सर्वच लोकांचा कल याकडे वाढत आहे.
सध्याचा चांदीचा दर
श्री गणेश अलंकार ज्वेलर्सचे युवराज नेवलेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या चांदीचा दर प्रतिकिलो 1 लाख 14 हजार रुपये असून, दहा ग्रॅमचा दर 1,140 रुपये आहे. रक्षाबंधनाच्या आठवड्यात मागणी मोठ्या प्रमाणात वाढल्याने, बाजारात चांदीच्या राख्यांचे स्टॉल्स झगमगू लागले आहेत.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Rakshabandhan 2024: रक्षाबंधनात चांदीच्या राख्यांचा ट्रेंड; कस्टमाईज डिझाईन्समुळे वाढली मागणी, दर काय?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement