वाईन न वापरताच घरच्या घरी तयार करा प्लम केक, रेसिपीही अगदी सोपी

Last Updated:

Christmas Recipe: ख्रिसमसला अनेक ख्रिश्चन बांधव वेगवेगळ्या प्रकारचे केक घरात बनवत असतात. अगदी सोप्या पद्धतीनं घरच्या घरी प्लम केक बनवू शकता.

+
वाईन

वाईन न वापरताच घरच्या घरी तयार करा प्लम केक, रेसिपीही अगदी सोपी

अपूर्वा तळणीकर, प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : ख्रिश्चन बांधवांचा सण ख्रिसमस अवघ्या काही दिवसांवरती येऊन ठेपला आहे. ख्रिसमससाठी वेगवेगळे गोड पदार्थ तयार केले जातात. पण एक पदार्थ जो आवर्जून केला जातो तो म्हणजे केक. ख्रिसमससाठी वेगवेगळ्या प्रकारचे केक बनवले जातात. यात प्लम केक तर आवर्जून बनवला जातो. हा केक बनवण्यासाठी वाईन किंवा रमचा वापर केला जातो. परंतु, हे काहीही न वापरता अगदी सोप्या पद्धतीनं घरच्या घरी आपण प्लम केक बनवू शकतो. याची रेसिपी छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. प्रज्ञा तल्हार यांनी सांगितली आहे.
advertisement
प्लम केक साठी लागणारे साहित्य 
एक वाटी मैदा, अर्धी वाटी साखर, पाव वाटी बटर, पाव वाटी तेल, अर्धी वाटी दही, व्हॅनिला इसेन्स आणि दोन टी स्पून बेकिंग सोडा, दोन वाट्या ऑरेंज ज्यूस, थोडीशी चेरी, बदाम,काजू, खजूर, एप्रिकॉट, किसमिस, रेड क्राइमबेरी किंवा तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट देखील ॲड करू शकता.
advertisement
केक बनवण्याची कृती
सुरुवातीला एका मोठ्या भांड्यामध्ये बटर घ्यायचे आणि त्यामध्ये साखर टाकायची. त्यानंतर त्यामध्ये तेल टाकायचं. हे सगळं एकत्र फेटून घ्यायचं. हे फेटून झाल्यानंतर याला थोडं बाजूला ठेवायचं. आपण जो ऑरेंज ज्यूस घेतलेला आहे त्यामध्ये हे सर्व ड्रायफ्रूट टाकायचे आणि त्यांना व्यवस्थित भिजत ठेवायचं. याला रात्रभर भिजत ठेवावं लागतं. पण जर तुम्ही रात्रभर भिजत ठेवलं नसेल तर तुम्ही याला दोन मिनिटांसाठी मायक्रोवेव्हमध्ये देतील ठेवू शकता. जेणेकरून हे सॉफ्ट होतील. अशा पद्धतीने हे ड्रायफ्रूट तुम्ही भिजवून घालायचे आहेत.
advertisement
साखर, बटर आणि तेलाच्या मिश्रणात आपल्याला दही टाकायचं आहे. हे दही फेटून घ्यायचं. त्यानंतर त्यामध्ये परत मैदा टाकायचा. पाच ते सहा थेंब व्हॅनिला फ्लेवरच इसेन्स टाकायचं आणि दोन चमचे बेकिंग सोडा टाकायचा. हे सगळं एकत्र करून घ्यायचं. त्यानंतर भिजवलेले ड्रायफ्रूट त्यामधला रस बाजूला करून हे सर्व त्यामध्ये टाकायचं. ते सर्व एकत्रित एकजीव करून घ्यायचं आणि गरज भासल्यास त्यामध्ये थोडसं तो रस टाकायचा.
advertisement
हे सर्व एकत्र केल्यानंतर एक भांड घ्यायचं. त्यामध्ये तुम्ही केक तयार करण्यासाठी लागणार भांडं देखील घेऊ शकता. त्यामध्ये तेल लावायचं आणि त्याच्यावरून थोडा मैदा टाकून ते व्यवस्थित रित्या स्प्रेड करून घ्यायचं. आपण तयार केलेलं मिश्रण त्यामध्ये टाकायचं आणि वरतून थोडेसे चॉकलेटचे तुकडे टाकायचे. याला तुम्ही 180 डिग्री सेल्सियसला अर्धा तासासाठी ठेवायचं. जर तुमच्याकडे ओव्हन नसेल तर तुम्ही कढईमध्ये देखील हा केक तयार करू शकता. कढईत 40 मिनिटांमध्ये हा केक बनवून तयार होतो, असं डॉ. तल्हार सांगतात.
advertisement
अगदी सोप्या पद्धतीने प्लम केक तुम्ही घरी बनवू शकता. तसेच आपला ख्रिसमस स्पेशल बनवू शकता.
view comments
मराठी बातम्या/रेसिपी/
वाईन न वापरताच घरच्या घरी तयार करा प्लम केक, रेसिपीही अगदी सोपी
Next Article
advertisement
Shiv Sena Candidate List BMC Election: बीएमसी निवडणुकीत एकनाथ शिंदेंचा मास्टरस्ट्रोक! ६० उमेदवार तयार, तिकीट कुणाला?
बीएमसी निवडणुकीत एकनाथ शिंदेंचा मास्टरस्ट्रोक! ६० उमेदवार तयार, तिकीट कुणाला?
  • भाजपसोबत जागा वाटपाची चर्चा सुरू असताना दुसरीकडे एकनाथ शिंदे यांना मोठा निर्णय घ

  • शिंदे यांनी आपल्या ६० उमेदवारांना तयार राहण्याचे आदेश दिले आहेत.

  • एकनाथ शिंदे यांनी आपली ताकद दाखवण्यास सुरुवात केली आहे.

View All
advertisement