दिल्लीचे छोले कुलचे खाल्लेत का? पुण्यातील या ठिकाणाला द्या भेट
- Published by:News18 Marathi
Last Updated:
दिल्लीतील फेमस स्ट्रीट फूड छोले कुलचे हे आता पुण्यात मिळत आहेत.
पुणे, 10 डिसेंबर: स्ट्रीट फूड हे तसं सर्वांच्या आवडीचं असतं. आपण दाबेली, पाणीपुरी असे स्ट्रीट फूडचे अनेक पदार्थ खाल्ले असतील. पण छोले कुलचे कधी खाल्लेत का ? छोले कुलचे हे दिल्लीतील फेमस स्ट्रीट फूड आहे. आता हे दिल्ली स्टाईलने बनवलेले छोले कुलचे पुण्यात खायला मिळतायेत. पुण्यातील झेड ब्रिज जवळ असलेल्या खाऊ गल्ली येथे हे दिल्लीचे फेमस बटर छोले कुलचे मिळतात. तसंच चिज बटर कुलचे, पनीर छोले कुलचे देखील मिळतात. परंतु हे छोले कुलचे नेमके कसे बनवले जातात या विषयी जाणून घेऊयात.
छोले कुलचे कसे बनवतात?
मोठ्या सपाट लोखंडी तव्यावर भरपूर कांदा, टोमॅटो, सिमला मिरची टाकून त्यावर भाजलेल्या जिऱ्याची पूड आणि भरपूर कोथिंबीर घालून ते एकत्रित सर्व शिजून घेतलं जात. त्यामध्ये छोले मसाला टाकून मस्त परतून घेतलं जात. हा एक पौष्टिक पदार्थ आहे. रात्रीचं जेवण किंवा दुपारचं जेवण म्हणून देखील हे खाऊ शकता, असं विक्रेते सांगतात.
advertisement
किती आहे किंमत?
बटर छोले कुलचे, पनीर, चीझ बटर हे तीन प्रकार या ठिकाणी मिळतात. याची किंमत 60 रुपये ते 90 रुपये इतकी आहे. ही डिश खायला देखील अतिशय टेस्टी आहे. कमी पैशांत चांगली डिश या ठिकाणी मिळते, अशी माहिती छोले कुलचे विक्रेते पवन कुमार यांनी दिली आहे. छोले कुलचे खाण्यासाठी लांबून लोक झेड ब्रिजजवळील श्री गणेश दिल्ली चाट येथे येतात.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
December 10, 2023 9:45 AM IST