Ambadi Bhaji Recipe: शरिरासाठी पौष्टिक पावसाळी भाजी, डॉक्टरही देतात खाण्याचा सल्ला, अशी बनवा सोपी रेसिपी, Video

Last Updated:

पावसाळ्यामध्ये विविध रानभाज्या मार्केटमध्ये येतात. त्यात वेगवेगळे औषधी गुणधर्म असल्याने सर्वजण ते आवडीने खातात. त्यातीलच एक म्हणजे अंबाडीची भाजी.

+
Ambadi

Ambadi Bhaji

अमरावती: पावसाळ्यामध्ये विविध रानभाज्या मार्केटमध्ये येतात. त्यात वेगवेगळे औषधी गुणधर्म असल्याने सर्वजण ते आवडीने खातात. त्यातीलच एक म्हणजे अंबाडीची भाजी. ही भाजी पचनशक्ती वाढविण्यास मदत करते. तसेच रक्त शुद्धीकरण देखील करते. त्यामुळे पावसाळ्यात एकदा तरी ही भाजी आहारात घेण्याचा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात येतो. ही भाजी बनविण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. अंबाडीची भाजी पारंपरिक पद्धतीने कशी बनवायची? त्याची रेसिपी अमरावतीच्या गृहिणी मंदा बहुरूपी यांनी दिली आहे.
अंबाडीची भाजी बनविण्यासाठी लागणारे साहित्य 
अंबाडीची भाजी, ज्वारी, लसूण, मिरची, जिरे, मीठ आणि तेल हे साहित्य लागेल.
अंबाडीची भाजी बनविण्याची कृती 
सर्वात आधी अंबाडीची भाजी शिजायला ठेवायची आहे. भाजी शिजायला थोडा वेळ लागेल. भाजी शिजतपर्यंत मसाला तयार करून घ्यायचा आहे. त्यासाठी ज्वारी बारीक करून घ्यायची आहे. त्यानंतर मिरची, जिरे आणि लसूण बारीक करून घ्यायचं आहे. तोपर्यंत भाजी शिजलेली असेल. ती भाजी रवीच्या साहाय्याने बारीक करून घ्यायची आहे. त्यानंतर त्यात लसूण पेस्ट टाकून घ्यायची आणि मीठ टाकून घ्यायचे आहे. त्यानंतर ते मिक्स करून घ्यायचे आहे. त्यानंतर त्यात थोडे तेल टाकून घ्यायचे. त्यानंतर भाजी 5 मिनिटे शिजू द्यायची आहे. 5 मिनिटानंतर त्यात ज्वारीची कणी टाकून घ्यायची आहे.त्यानंतर भाजी 15 मिनिटे शिजवून घ्यायची आहे. पारंपरिक पद्धतीने अंबाडीची भाजी तयार झालेली असेल.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/रेसिपी/
Ambadi Bhaji Recipe: शरिरासाठी पौष्टिक पावसाळी भाजी, डॉक्टरही देतात खाण्याचा सल्ला, अशी बनवा सोपी रेसिपी, Video
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement