मसालेदार अन् झटपट होणारी चिकन मसाला मॅगी भेळ म्हणजे non veg लव्हरसाठी पर्वणीच; एकदा रेसिपी पाहाच

Last Updated:

भूक लागली आणि पटकन काहीतरी खाण्याची इच्छा झाली तर आपल्याला सर्वात आधी मॅगी आठवते. ठाण्यातील शेफ कुणाल परब यांनी चिकन मसाला मॅगी भेळची अवघ्या 10 ते 15 मिनिटांत होणारी रेसिपी सांगितली आहे.

+
News18

News18

मयुरी सर्जेराव, प्रतिनिधी
मुंबई : भूक लागली आणि पटकन काहीतरी खाण्याची इच्छा झाली तर आपल्याला सर्वात आधी मॅगी आठवते. लहान मुलांसाठी तर मॅगी म्हणजे खूप लोकप्रिय खाद्य आहे. चिज मॅगी, व्हेजीटेबल मॅगी किंवा साधी मॅगी आपण कित्येकदा खाल्ली असेल. पण तुम्ही कधी चिकन मसाला मॅगी भेळ खाल्लीये का? नसेल खाल्ली तर नॉनव्हेज आणि मॅगीच्या चाहत्यांसाठी ही रेसिपी म्हणजे चटपटीत असं फ्यूजन आहे. चिकनमध्ये किंवा मॅगीमध्ये काही वेगळं ट्राय करायचं असेल तर या दोघांचं हे कॉम्बिनेशन भुकेला आणि जिभेला शांत करण्याची रेसिपी आहे. ही मॅगी भेळ चवीला खूप मसालेदार आणि कुरकुरीत असते. ठाण्यातील शेफ कुणाल परब यांनी या मॅगीची अवघ्या 10 ते 15 मिनिटांत होणारी रेसिपी सांगितली आहे.
advertisement
चिकन मसाला मॅगी भेळ तयार करण्यासाठी लागणारे साहित्य
1 पॅकेट मॅगी, बॉईल किंवा फ्राय चिकनचे पीस, 1 चीज क्यूब, कांदा, टोमॅटो हिरवी मिरची (जेवढी तिखट हवी आहे त्यानुसार ), शिमला मिरची, कोथिंबीर, लाल तिखट, मॅगी मसाला, मीठ चवीनुसार, रेड चिली सॉस, टीस्पून टोमॅटो सॉस, चाट मसाला हे साहित्य लागेल.
advertisement
मॅगी भेळ बनवण्यासाठी आधी मॅगीला क्रश करा. मग एका कढईत तेल चांगले तापवून त्या तेलात मॅगी घालून चांगली तळून घ्या. मॅगी तळताना ती करपणार नाही याची काळजी घ्या. नंतर कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, कोथिंबीर अशा सर्व भाज्या धुवून बारीक चिरून मॅगीत मिक्स कराव्यात. बॉईल किंवा फ्रईड चिकनचे बारीक तुकडे करून मॅगीत टाकावे. त्यानंतर मॅगीमध्ये टोमॅटो सॉस आणि रेड चिली सॉस घालून मिक्स करावे. नंतर मीठ, मॅगी मसाला, चाट मसाला आणि लाल तिखट घालावं. ओरिगॅनो आणि चिली फ्लेक्स घरात उपलब्ध असल्यास तेही टाकावे. सगळं मिश्रण आता चमचाने चांगले एकजीव करून घ्यावे. चवदार आणि मसालेदार चिकन मॅगी भेळ आता तयार आहे, असं कुणाल परब सांगतात.
advertisement
कवठाची पारंपरिक चटणी 5 मिनिटांत घरीच कशी बनवाल? सोप्या रेसिपीचा पाहा Video
चिकन मसाला मॅगी भेळ स्नॅकमध्ये तर तुम्ही बनवूही शकता. पण सोबतच कधी भाजी-चपाती खाण्याचा इच्छा नसेल तरीही तुम्ही ही चिकन मसाला मॅगी भेळ नक्की करून खाऊ शकता आणि चिकन नसेल तरीही चिकनची प्रोसेस वगळताही फक्त इतर सर्व कृती तशीच ठेवून तुम्ही मसाला चिज मॅगी भेळही बनवून खाऊ शकता. तुम्हीही ही चिकन किंवा विना चिकन मसाला मॅगी भेळ नक्की करून पाहा.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/रेसिपी/
मसालेदार अन् झटपट होणारी चिकन मसाला मॅगी भेळ म्हणजे non veg लव्हरसाठी पर्वणीच; एकदा रेसिपी पाहाच
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement