Monsoon Recipe: पावसाळ्यात चटपटीत खावंसं वाटतंय? झटपट बनवा रव्याचे कुरकुरे, रेसीपीचा संपूर्ण Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
रिमझिम पाऊस सुरू असताना सतत काही तरी चटपटीत खावंसं वाटत. झटपट बनवणारे पदार्थ तर भरपूर असतात पण, बनवण्याचा कंटाळा येतो. अशावेळी तुम्ही कुरकुरीत असे रव्याचे समोसे किंवा कुरकुरे बनवून ठेवू शकता.
अमरावती: रिमझिम पाऊस सुरू असताना सतत काही तरी चटपटीत खावंसं वाटत. झटपट बनवणारे पदार्थ तर भरपूर असतात पण, बनवण्याचा कंटाळा येतो. अशावेळी तुम्ही कुरकुरीत असे रव्याचे समोसे किंवा कुरकुरे बनवून ठेवू शकता. जे खाऊन तुम्हाला अगदी बाहेरील वेफर्स खाण्याचा फिल येईल. फक्त रवा वापरून बनवलेले हे पदार्थ खाण्यासाठी अतिशय टेस्टी लागतो. बनवल्यानंतर अगदी 10 ते 15 दिवस हे पदार्थ सहज टिकतात. याची रेसिपी अमरावतीच्या गृहिणी सारिका पापडकर यांनी दिली आहे.
रव्याचे कुरकुरे बनवण्यासाठी लागणारे साहित्य
1वाटी रवा, तेल, मीठ, काळे मीठ, चाट मसाला, लाल तिखट, हळद, धने पावडर, पिठी साखर हे साहित्य लागेल.
रव्याचे कुरकुरे बनवण्याची कृती
सर्वात आधी आपल्याला रवा भिजवण्यासाठी पाणी कोमट करून घ्यायचं आहे. त्यांनतर एका भांड्यात रवा टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर त्यात मीठ टाकून घ्या. त्यानंतर चार छोटे चमचे तेल गरम करून घ्यायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर ते रव्यामध्ये मिक्स करून घ्या. तेल व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर कोमट पाणी टाकून रवा भिजवून घ्यायचा आहे.
advertisement
रवा भिजवून झाल्यानंतर 15 मिनिट सेट होण्यासाठी झाकण ठेवून बाजूला ठेवा. 15 मिनिटनंतर रवा व्यवस्थित सेट झालेला असेल. त्यांनतर कुरकुरे बनवायला घ्या.
त्यासाठी सेट झालेल्या रव्याची मोठ्या आकाराची पोळी बनवून घ्यायची आहे. पोळी पातळ लाटायची आहे. पोळी लाटून झाल्यानंतर याचे हवे तसे काप तुम्ही करू शकता. तुम्हाला लागत असल्यास तुम्ही लांब कुरकुरे सारखे सुद्धा काप करू शकता. सर्व काप करून झाल्यानंतर ते तळून घ्यायचे आहे. गोल्डन ब्राऊन होईपर्यंत हे कुरकुरे तळून घ्या.
advertisement
त्यानंतर कुरकुरे तयार होईल. त्यात मसाले मिक्स करून घ्या. काळे मीठ आणि चाट मसाला टाकून हे कुरकुरे अतिशय चटपटीत लागतात. अशाप्रकारे वेगवेगळ्या आकाराचे कुरकुरे तुम्ही बनवू शकता. यात फक्त रवा वापरला असल्यानं लहान मुलांना सुद्धा तुम्ही हे देऊ शकता.
Location :
Amravati,Maharashtra
First Published :
June 27, 2025 7:08 PM IST
मराठी बातम्या/रेसिपी/
Monsoon Recipe: पावसाळ्यात चटपटीत खावंसं वाटतंय? झटपट बनवा रव्याचे कुरकुरे, रेसीपीचा संपूर्ण Video