Potato Triangle Recipe : संध्याकाळच्या नाश्त्यासाठी बेस्ट पर्याय, घरीच बनवा क्रिस्पी पोटॅटो ट्रेंगल, रेसिपीचा Video
- Reported by:Bhavna Arvind Kamble
- Published by:Mohan Najan
Last Updated:
संध्याकाळच्या नाश्त्याला असो क्रिस्पी पोटॅटो ट्रेंगल हा नेहमीच एक बेस्ट पर्याय आहे. कमी साहित्य, कमी वेळ आणि जास्त चव म्हणूनच घराघरांत ही रेसिपी पटकन हिट होते.
मुंबई : सकाळी मुलांच्या डब्यात द्यायला असो किंवा संध्याकाळच्या नाश्त्याला असो क्रिस्पी पोटॅटो ट्रेंगल हा नेहमीच एक बेस्ट पर्याय आहे. कमी साहित्य, कमी वेळ आणि जास्त चव म्हणूनच घराघरांत ही रेसिपी पटकन हिट होते. साध्या बटाट्यांपासून तयार होणारा हा छोटासा नाश्ता मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारा आहे. चहासोबत काहीतरी झटपट पण चवदार खायचं असेल तर ही रेसिपी अगदी बेस्ट आहे.
क्रिस्पी पोटॅटो ट्रेंगल साहित्य
उकडलेले बटाटे – 4 मध्यम
कॉर्नफ्लोअर किंवा तांदळाचे पीठ – 2 टेबलस्पून
हिरवी मिरची-आलं पेस्ट – 1 टीस्पून
लाल तिखट – 1 टीस्पून
हळद – ¼ टीस्पून
मीठ – चवीनुसार
कोथिंबीर – 2 टेबलस्पून
चिली फ्लेक्स
ऑरगॅनो
तेल – शॅलो फ्रायसाठी
advertisement
क्रिस्पी पोटॅटो ट्रेंगल कृती
उकडलेले बटाटे मॅश करून घ्या. त्यात कॉर्नफ्लोअर, तिखट, हळद, मीठ, चिली फ्लेक्स, ऑरगॅनो आणि कोथिंबीर घालून छान मिसळा.
हे मिश्रण एकसारखे मळून घ्या. एका ताटात किंवा पाटावर हे मिश्रण हलकेसे थापून घ्या आणि त्रिकोणी आकाराचे तुकडे कापा. तव्यावर थोडे तेल घालून हे ट्रेंगल दोन्ही बाजूंनी सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत शॅलो फ्राय करा. गरमागरम ट्रेंगल सॉस किंवा चटणीसोबत सर्व्ह करा.
advertisement
फक्त नाश्त्यालाच नाही तर आपण कधीही हे क्रिस्पी पोटॅटो ट्रेंगल बनवू शकतो आणि सॉस किंवा चटणीसोबत खाऊ शकतो.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Nov 21, 2025 3:42 PM IST
मराठी बातम्या/रेसिपी/
Potato Triangle Recipe : संध्याकाळच्या नाश्त्यासाठी बेस्ट पर्याय, घरीच बनवा क्रिस्पी पोटॅटो ट्रेंगल, रेसिपीचा Video








