Snake in Dream: स्वप्नात साप म्हणजे धनलाभ? आठवड्यातील या दिवशी दिसणारे नशीबवान, छप्परफाड पैसा-गुडन्यूज
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Snake Dream Astrology: फक्त साप म्हटलं तरी अनेकांची गाळण उडते. पण याच सापाला हिंदू धर्मात पूजनीयही मानलं जातं, नागपंचमीसारख्या विशेष दिवशी त्याची शेतकऱ्यांचा मित्र म्हणून पूजा केली जाते. महादेवाच्या गळ्यात साप असल्यानं तो भक्तीचेही प्रतिक आहे. काही लोकांना जाईल तिथं साप दिसतात. सापांचा संबंध ज्योतिषशास्त्रात विविध प्रकारे सांगितला जातो. हिंदू धर्मात सापांना महत्त्वाचे स्थान असल्याचे स्पष्ट होते.
advertisement
स्वप्न शास्त्रानुसार सोमवारी स्वप्नात साप दिसणे खूप शुभ मानले जाते. सोमवार हा महादेवाला समर्पित आहे, शिव-शंकर स्वतः आपल्या गळ्यात नाग वासुकी धारण करतो. सोमवारी स्वप्नात साप दिसला तर यापेक्षा चांगले काय असू शकते. सोमवारी स्वप्नात साप दिसणे म्हणजे तुमचा काळ लवकरच बदलणार असून तुमचे सर्व त्रास संपणार आहेत. स्वप्नात साप दिसणं म्हणजे अडकलेले पैसे परत मिळण्याचे देखील संकेत असतात. याशिवाय, ती बाब आध्यात्मिक प्रगतीचे प्रतीक मानतात.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement






