advertisement

Mumbai: त्याच्या मेंदूचा चेंदामेंदा झाला, पण एकही मदतीला पुढे आला नाही, मुंबईतलं संतापजनक दृश्य

Last Updated:

दहिसर पूर्व येथील चौकीजवळ ही घटना घडली. एक व्यक्ती स्कूटरवरून जात असताना अचानक तोल जाऊन रस्त्यावर पडला.

News18
News18
विजय वंजारा, प्रतिनिधी
मुंबई : मुंबईच्या रस्त्यावर सध्या वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस किचकट बनत चालली आहे. एकीकडे बेशिस्त वाहतूक आणि दुसरीकडे नियमांचं उल्लंघन करणारे दुचाकीस्वार यामुळे मुंबईत ठिकठिकाणी अपघाताच्या घटना घडत आहे. अशातच मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दहिसरमध्ये एका स्कुटरस्वाराला अज्ञात वाहनाने चिरडलं. या स्कुटरस्वाराच्या डोक्यावरूनच गाडीचं चाक गेलं, त्यामुळे त्याचा जागेवरच मृत्यू झाला. संतापजनक म्हणजे, या व्यक्तीचा मृतदेह रस्त्यावर पडला होता, अन् कुणीही समोर येऊन मृतदेहावर कापड टाकू शकलं नाही. हेल्मेट वापरा, असा सल्ला देणारे व्हिडीओ बनवले जात आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार,  मुंबईतील दहिसर पूर्व परिसरात दुपारच्या सुमारास ही घटना घडली आहे.  स्कूटरवरून जात असलेला एक व्यक्ती अचानक नियंत्रण सुटल्यामुळे रस्त्यावर पडला. पण, त्याचवेळी मागून येणाऱ्या ट्रकच्या चाकाखाली सापडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
अधिक माहिती अशी की,, दहिसर पूर्व येथील चौकीजवळ ही घटना घडली. एक व्यक्ती स्कूटरवरून जात असताना अचानक तोल जाऊन रस्त्यावर पडला. त्याचवेळी मागून येणाऱ्या भरधाव ट्रकचं टायर त्या स्कुटरस्वाराच्या डोक्यावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या व्यक्तीची ओळख अद्याप पटली नाही.
advertisement
'हेल्मेट वापरा, हेल्मेट वापरा'
मात्र, रस्त्यावर या व्यक्तीचा मृतदेह पडलेला होता. डोक्याचा चेंदामेंदा झाला होता. पण, रस्यावर कुणी गाडी थांबवून मृतदेह झाकण्यासाठी साधा कापड कुणी टाकायला पुढे आला नाही. उलट काही तरुण या मृत व्यक्तीचा व्हिडीओ रेकॉर्ड करत होते, मी सांगतोय ना, 'हेल्मेट वापरा, हेल्मेट वापरा' असं सांगत रिल बनवत असल्याचा प्रकार समोर आला. व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, एकही माणूस गाडी थांबवून पुढे येण्याची हिंमत करत नाही.
advertisement
पोलिसांनी मृतदेह रुग्णालयात पाठवला
या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झालं होतं. अपघाताची माहिती मिळताच अखेरीस दहिसर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृत व्यक्तीचा मृतदेह पुढील तपासासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला. या प्रकरणी दहिसर पोलीस अधिक तपास करत आहेत. ज्या वाहनाने चिरडलं त्याचा शोध घेतला जात आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai: त्याच्या मेंदूचा चेंदामेंदा झाला, पण एकही मदतीला पुढे आला नाही, मुंबईतलं संतापजनक दृश्य
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement