Garlic Bread Recipe : स्पेशल खायचं मन करतंय? घरबसल्या बनवा डॉमिनोजसारखा गार्लिक ब्रेड, रेसिपीचा संपूर्ण Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Bhavna Arvind Kamble
Last Updated:
खमंग लसूणाच्या सुवासाने दरवळणारा आणि बटरमध्ये न्हालेला गार्लिक ब्रेड तुम्ही अगदी घरच्या घरी तयार करू शकता.
मुंबई : पोटात भूक लागली की मन म्हणतं आज काहीतरी स्पेशल खायचंय… मग अनेकजणांचा पहिला पर्याय असतो डॉमिनोजचा स्वादिष्ट चीजी ब्रेड. पण प्रत्येक वेळी बाहेरून मागवायचं म्हणजे खर्चही वाढतो आणि आरोग्याचाही प्रश्न उभा राहतो. पण आता काळजी नका करू खमंग लसूणाच्या सुवासाने दरवळणारा आणि बटरमध्ये न्हालेला गार्लिक ब्रेड तुम्ही अगदी घरच्या घरी तयार करू शकता. तोही फक्त काही साध्या घटकांमध्ये आणि अवघ्या 10 मिनिटांत. पाहुयात याची रेसिपी कशी बनवायची.
गार्लिक ब्रेड साहित्य (2 व्यक्तींसाठी)
ब्रेड स्लाइस – 4
बटर – 2 मोठे चमचे
लसूण (बारीक चिरलेला किंवा किसलेला) – 10-12 पाकळ्या
कोथिंबीर – थोडीशी (बारीक चिरलेली)
बारीक चिरलेली एक मिरची
मीठ – चवीनुसार
चीज - किसलेले
चिली फ्लेक्स: चवीनुसार
advertisement
गार्लिक ब्रेड कृती
1. एका छोट्या वाडग्यात बटर, लसूण, कोथिंबीर, चिली फ्लेक्स आणि चिमूटभर मीठ एकत्र करून छान मिक्स करा.
2. हे मिश्रण ब्रेडच्या स्लाइसवर समान पसरवा.
3. ओव्हनमध्ये 180° C वर 5-7 मिनिटं बेक करा (किंवा तव्यावर 2 मिनिट खरपूस होईपर्यंत भाजा).
4. वरून किसलेलं चीज टाकून अजून एक मिनिट तव्यावर ठेवा आणि बघा तुमचा डॉमिनोज-स्टाईल गार्लिक ब्रेड तयार!
advertisement
सोनसळी रंग, वितळलेलं बटर, आणि लसूणाचा झणझणीत सुगंध पहिला घास घेताच तुम्हाला वाटेल की रेस्टॉरंटचं खाणं घरात आलंय.
टिप: टोमॅटो केचप, मॅयो किंवा चीज डिपसोबत सर्व्ह करा.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 12, 2025 3:40 PM IST
मराठी बातम्या/रेसिपी/
Garlic Bread Recipe : स्पेशल खायचं मन करतंय? घरबसल्या बनवा डॉमिनोजसारखा गार्लिक ब्रेड, रेसिपीचा संपूर्ण Video

