advertisement

Kairiche Lonche : जेवणासोबत काही तरी चटपटीत हवाय? घरगुती साहित्यापासून घरीच तयार करा कैरीच लोणच, रेसिपीचा Video

Last Updated:

जेवणासोबत काही तरी चटपटीत असावं म्हणून झटपट तयार होणार कैरीच लोणच अगदी घरगुती साहित्यापासून तयार होते. चार ते पाच दिवस खाण्यासाठी तुम्ही हे लोणच बनवून ठेऊ शकता. 

+
Summer

Summer Special Recipe 

अमरावती : मार्केटमध्ये कैरीची आवक सुरू झाली. त्यापासून महिला विविध पदार्थ बनवत आहेत. वर्षभर साठवण्यासाठी लोणच बनवायला अधिक वेळ आहे. त्यासाठी ऑप्शन म्हणून तुम्ही कैरीच साधं लोणच बनवू शकता. जेवणासोबत काही तरी चटपटीत असावं म्हणून झटपट तयार होणार कैरीच लोणच अगदी घरगुती साहित्यापासून तयार होते. चार ते पाच दिवस खाण्यासाठी तुम्ही हे लोणच बनवून ठेऊ शकता.
कैरीच लोणच बनवण्यासाठी लागणारे साहित्य:- बारीक काप केलेली कैरी, तेल, साखर, हळद, जिरे, मोहरी आणि लाल तिखट हे साहित्य लागेल. 
कैरीचे लोणचे बनवण्याची कृती:- सर्वात आधी बारीक काप केलेली कैरी एका भांड्यात काढून घ्यायची आहे. त्यांनतर त्यात मीठ टाकून घ्यायचं आहे. मीठ त्यात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. आता त्यात लाल तिखट टाकायचं आहे.  तिखट हे तुमच्या अंदाजानुसार टाकायचं आहे. तिखट सुद्धा कैरीत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. 
advertisement
तिखट आणि मीठ व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर यात हळद टाकून घ्यायची आहे. लोणच्याला कलर येण्यासाठी आपण हळद टाकून घ्यायची आहे. त्यांनतर आणखी मिक्स करून घाय्याच आहे. तिखट हळद आणि मीठ व्यवस्थित मिक्स केल्यानंतर कैरीचा छान रंग आलेला असेल. त्यानंतर एका वाटीमध्ये तेल गरम करून घ्यायचं. तेल गरम झालं की जिरे आणि मोहरी टाकून घ्यायची. जिरे आणि मोहरी तेलात छान तळतळली की ते तेल कैरित टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर ते व्यवस्थित मिक्स करून घ्या. त्यानंतर त्यात साखर टाकून घ्यायची. साखर तुमच्या अंदाजानुसार टाकायची आहे. साखर सुद्धा यात मिक्स करून घ्यायची. 
advertisement
आता हे सर्व मिक्स झाल्यानंतर लोणचे 1 ते 2 तास बाजूला झाकून ठेवायचे आहे. त्यातील साखर मुरत आली की लोणचे खाण्यासाठी टेस्टी लागते. आता 2 तासानंतर लोणच तयार झालेलं असेल. दररोजच्या जेवणासोबत तुम्ही हे झटपट तयार होणार चटपटीत लोणच खाऊ शकता.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/रेसिपी/
Kairiche Lonche : जेवणासोबत काही तरी चटपटीत हवाय? घरगुती साहित्यापासून घरीच तयार करा कैरीच लोणच, रेसिपीचा Video
Next Article
शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी; घराची किंमत ऐकून थक्क व्हाल
शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी
  • कोटींचा टॅक्स भरून गिलने 'या' मजल्यावर बुक केला फ्लॅट

  • नव्या घराचे इनसाईड डिटेल्स आले समोर

  • 3300 स्क्वेअर फुटांचा फ्लॅट अन् बरंच काही...

View All
advertisement