जेवणाची वाढेल गोडी, पारंपरिक कारळ्याची बनवा चटणी, सोप्या रेसिपीचा Video
- Reported by:Pooja Satyavan Patil
- Published by:Mohan Najan
Last Updated:
आज आपण जेवणासोबत खाल्ली जाणारी पारंपरिक आणि आरोग्यदायी कारळ्याची चटणी तयार करण्याची सोपी पद्धत पाहणार आहोत.
पुणे: आपल्या रोजच्या जेवणाची चव वाढवणारी आणि आरोग्यासाठी उपयुक्त अशी खास पारंपरिक चटणी आज आपण बनवणार आहोत. ती म्हणजे कारळ्याची चटणी. काही भागात तिला कोरट्याची किंवा खुरासणीची चटणी देखील म्हणतात. कारळे हे केस आणि त्वचेसाठी गुणकारी मानले जातात आणि रोज सेवन केल्यास पांढरे केस काळे होण्यास मदत होते. कमी साहित्यात आणि कमी वेळेत ही चटणी तयार होते. ही रेसिपी वसुंधरा पाटुकले यांनी बनवून दाखवली आहे.
कारळ्याची चटणी बनवण्यासाठी लागणारं साहित्य
कारळे, जिरे, तीळ, भाजलेले सुके खोबरे, लसूण, कोथिंबीर, लाल मिरची, मीठ चवीनुसार हे साहित्य लागेल.
कारळ्याची चटणी कृती
आज आपण जेवणासोबत खाल्ली जाणारी पारंपरिक आणि आरोग्यदायी कारळ्याची चटणी तयार करण्याची सोपी पद्धत पाहणार आहोत. सुरुवातीला एक वाटी कारळे भाजून त्यात थोडे जिरे टाकावे, जे कारळ्याबरोबर हलक्या आचेवर भाजले जातील. भाजलेले कारळे आणि जिरे कॉटनच्या कापडावर पसरवून थोडे थंड होऊ द्या.
advertisement
त्यानंतर दोन टेबलस्पून भाजलेले तीळ घालून मिक्सरमध्ये अर्धवट बारीक करून प्लेटमध्ये काढा. नंतर भाजलेल्या सुक्या खोबऱ्याचा किस, 7-8 लसूण पाकळी आणि थोडीशी कोथिंबीर मिक्सरमध्ये फिरवून घ्या. त्यात आधी तयार केलेले कारळे, मीठ आणि लाल मिरची पावडर घालून पुन्हा चांगले मिक्स करा. तर अशा पद्धतीने आपली चटणी तयार झाली आहे. ही चटणी ज्वारी किंवा बाजरीच्या भाकरीबरोबर खाल्ल्यास ती अत्यंत चविष्ट लागते. कारळे केवळ चव वाढवणारे नाहीत, त्याचे आरोग्याच्या दृष्टिकोनातून देखील मोठ्या प्रमाणात फायदे आहेत.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 16, 2026 5:15 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/रेसिपी/
जेवणाची वाढेल गोडी, पारंपरिक कारळ्याची बनवा चटणी, सोप्या रेसिपीचा Video







