सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट, चवदार आणि हेल्दी मेथी पराठा, रेसिपीचा संपूर्ण Video
- Reported by:Bhavna Arvind Kamble
- Published by:Mohan Najan
Last Updated:
पारंपरिक चव आणि पौष्टिकतेचा परफेक्ट मेळ असलेला मेथी पराठा हा एक उत्तम पर्याय ठरतो. मेथीमुळे शरीराला फायबर, आयर्न मिळतं.
मुंबई : सकाळची सुरुवात जर चविष्ट, पौष्टिक आणि पोटभर नाश्त्याने झाली तर संपूर्ण दिवस फ्रेश आणि एनर्जेटिक जातो. पण रोज रोज काय नवीन बनवायचं जे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल आणि जास्त वेळही लागणार नाही, हा प्रश्न प्रत्येक घरात असतोच. अशावेळी पारंपरिक चव आणि पौष्टिकतेचा परफेक्ट मेळ असलेला मेथी पराठा हा एक उत्तम पर्याय ठरतो. मेथीमुळे शरीराला फायबर, आयर्न मिळतं. विशेष म्हणजे हा पराठा झटपट तयार होतो, डब्यासाठीही उत्तम आहे.
मेथी पराठा साहित्य
गव्हाचं पीठ – 2 कप
ताजी मेथी (चिरलेली) – 1 कप
हिरवी मिरची – 1 (बारीक चिरलेली)
आलं-लसूण पेस्ट – 1 टीस्पून
हळद – ¼ टीस्पून
जिरे – ½ टीस्पून
लाल तिखट – चवीनुसार
मीठ – चवीनुसार
तेल – 1–2 टेबलस्पून
पाणी – कणीक मळण्यासाठी
तूप/तेल – पराठे भाजण्यासाठी
advertisement
मेथी पराठा कृती
एका मोठ्या भांड्यात गव्हाचं पीठ, चिरलेली मेथी, हिरवी मिरची, आलं-लसूण पेस्ट आणि सगळे मसाले घाला. थोडं तेल टाकून पाणी घालत मऊ कणीक मळा. कणीक 10 मिनिटं झाकून ठेवा. नंतर लहान गोळे करून पराठे लाटा. गरम तव्यावर दोन्ही बाजूंनी तूप/तेल लावून सोनेरी होईपर्यंत भाजा.
वाढण्याची पद्धत
दही, लोणचं, बटर किंवा हिरवी चटणीसोबत गरमागरम मेथी पराठे सर्व्ह करा.
advertisement
टिप्स:
मेथी कडू वाटत असेल तर चिरल्यानंतर थोडी मीठ चोळून पिळून घ्या.
डब्यासाठी बनवत असाल तर थोडं जास्त तेल घातलं तरी चालतं – पराठे मऊ राहतात.
हा पौष्टिक आणि चविष्ट मेथी पराठा नाश्त्यासोबतच लंच किंवा डिनरसाठीही परफेक्ट आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 16, 2026 2:58 PM IST
मराठी बातम्या/रेसिपी/
सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट, चवदार आणि हेल्दी मेथी पराठा, रेसिपीचा संपूर्ण Video







