खोबऱ्याचं तेल आणि नारळाचे दूध, तुम्ही कधी अशी माशाच्या भाजीची रेसिपी पाहिली का? VIDEO
- Published by:News18 Marathi
Last Updated:
कोल्हापूरच्या एका हॉटेलच्या शेफने केरळी स्टाईल मच्छी करी असलेल्या मीन मोईली या पदार्थाची पाककृती सांगितली आहे. त्यामुळे यंदाच्या 31 डिसेंबरला आपण घरच्या घरीच माशाची एक स्पेशल डिश बनवू शकतो.
कोल्हापूर, 22 डिसेंबर : नॉनव्हेज म्हंटले की चिकन मटण मासे यांचे अनेक प्रकार आपल्या डोळ्यांसमोर येतात. मात्र प्रत्येक पदार्थ आपल्याला घरी बनवणे शक्य होत नाही. त्यामुळेच आपल्याला हॉटेलमध्ये जावे लागते. मात्र कोल्हापूरच्या एका हॉटेलच्या शेफने केरळी स्टाईल मच्छी करी असलेल्या मीन मोईली या पदार्थाची पाककृती सांगितली आहे. त्यामुळे यंदाच्या 31 डिसेंबरला आपण घरच्या घरीच माशाची एक स्पेशल डिश बनवू शकतो.
मीन मोईली मच्छी करी ही माशाची केरळ शैलीतील प्रसिद्ध मलईदार आणि स्वादिष्ट पाककृती आहे. यामध्ये छोटे माशांचे गोलाकार काप मसालेदार अशा नारळाच्या दुधाच्या ग्रेव्हीमध्ये शिजवले जातात. असा हा चविष्ट पदार्थ तुम्ही सोप्या पद्धतीने घरच्या घरी बनवून खावू शकता, असे राही डाइन इन् या हॉटेलचे शेफ असलेल्या इजाज सय्यद यांनी सांगितले आहे.
advertisement
ना ज्युसर, ना मिक्सर; या पद्धतीने 2 मिनिटांत बनवा संत्र्याचा ज्यूस
मीन मोईलीसाठी लागणारे साहित्य :
मीन मोईली बनवण्यासाठी आपण सुरमई किंवा पापलेट मासा वापरू शकतो. माशाचे काप हे सुरुवातीला आले, लसूण, हळद, मीठ लावून अर्धा तास मॅरीनेट करुन ठेवावे. तर पाककृतीसाठी कडिपत्ता, मोहरी, हळद, 2 उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या, एक वाटी बारीक चिरलेला कांदा आणि एक मोठी वाटी नारळाचे दूध लागते. याव्यतरिक्त नारळाचे तेल या पदार्थासाठी वापरावे. शक्यतो मासा बनवताना नारळाचे तेलच चवीसाठी उत्तम ठरते, मात्र घरगुती तेल देखील वापरता येते, असे इजाज यांनी सांगितले आहे.
advertisement
काय आहे पाककृती ?
1) सुरुवातीला पॅनमध्ये थोडे नारळाचे तेल घेऊन त्यात मोहरी टाकावी.
2) मोहरी छान तडतडल्यावर कडिपत्ता टाकावा.
3) त्यानंतर हिरव्या मिरच्या आणि बारीक चिरलेला कांदा टाकून परतून घ्यावे आणि यामध्ये थोडेसे मीठ टाकावे.
4) थोडीशी हळद आणि माशांच्या कापांच्या संख्येनुसार अंदाजे थोडे पाणी या मिश्रणात टाकावे.
advertisement
5) मिश्रण छान उकळू द्यावे आणि एक छोटा अर्धा लिंबू आपल्याला लागेल तितका आपण त्या मिश्रणात पिळावा.
6) चांगले उकळल्यानंतर माशांचे काप यामध्ये टाकून ते कप व्यवस्थित शिजवून घ्यावेत.
7) शेवटी मासा शिजल्याची खात्री करावी आणि गॅस मंद आचेवर ठेवून कच्च्या नारळाचे दूध त्यात मिसळावे. सर्व मिश्रण 2-3 मिनिटे छान उकळल्यानंतर मीन मोईली डिश तयार होते.
advertisement
ख्रिसमससाठी बनवा स्पेशल डिश, रब चॉकलेट बॉल एकदा ट्राय तर करा
ही डिश आपण पांढरा भात, केरळी परोठा, आप्पे, डोसा आदींसोबत खाऊ शकता. तर ही डिश 1-2 दिवस फ्रिजमध्ये राहू शकते. खाताना गरम करून घेऊन आपण या डिशचा आस्वाद घेऊ शकतो, असेही शेफ इजाज यांनी सांगितले आहे.
Location :
Kolhapur,Kolhapur,Maharashtra
First Published :
December 22, 2023 5:54 PM IST
मराठी बातम्या/रेसिपी/
खोबऱ्याचं तेल आणि नारळाचे दूध, तुम्ही कधी अशी माशाच्या भाजीची रेसिपी पाहिली का? VIDEO