ख्रिसमससाठी बनवा स्पेशल डिश, रब चॉकलेट बॉल एकदा ट्राय तर करा
- Published by:News18 Marathi
Last Updated:
ख्रिसमस आणि नवीन वर्षासाठी रब चॉकलेट बॉल रेसिपी नक्की ट्राय करू शकता.
छत्रपती संभाजीनगर, 21 डिसेंबर : ख्रिसमस आणि नवीन वर्षासाठी आता थोडे दिवस उरलेले आहेत. या काळात घरोघरी एखादी स्पेशल डिश बिनवली जाते. तुम्ही जर एखाद्या गोड डिशच्या शोधात असाल तर रब चॉकलेट बॉल एक उत्तम पर्याय आहे. हे चॉकलेट बॉल कसे तयार करायचे याची रेसिपी छत्रपती संभाजीनगर येथील गृहिणी श्रुती क्षीरसागर यांनी दिली आहे.
रब चॉकलेट बॉलसाठी साहित्य
रब चॉकलेट बॉल तयार करण्यासाठी तुम्ही केक बेस घ्या. तुम्ही बाजारात रेडिमेड केक बेसची प्रीमिक्स हे भेटते त्या पासून सुद्धा केक बेस तयार करू शकता. त्यासोबतच मैद्यापासून, रव्यापासून, बिस्किटांपासून देखील तुम्ही केकचा बेस हा तयार करून घेऊ शकता. तुमच्या चॉईस नुसार चॉकलेट सिरप, चोको चिप्स, डार्क कंपाउंड चॉकलेट, स्प्रिंकल्स हे साहित्य या रेसिपी साठी लागतं.
advertisement
कसा बनवायचा रब चॉकलेट बॉल?
सर्वप्रथम जो तुम्ही केकचा बेस तयार केलेला आहे तो बेस छान क्रश करून घ्यायचा आहे. किंवा तुम्ही त्याला मिक्सरमधून देखील काढू शकता. ते बारीक झाल्यानंतर त्यामध्ये क्रंच येण्यासाठी त्यामध्ये चोको चिप्स घालावे आणि नंतर चॉकलेट सिरप घालून त्याचे छान गोळे तयार करून घ्यायचे. हे गोळे तयार करून एका साईडला ठेवून द्यायचे. नंतर डार्क कंपाउंड चॉकलेट मेल्ट करून घ्यायचं हे मेल्ट झालेल्या चॉकलेट मध्ये ते गोळे छान डीप करून घ्यायचे.
advertisement
एका बटर पेपर वरती हे सर्व गोळे ठेवून त्यावरती गार्निशिंगसाठी तुम्ही चॉकलेटची शेव, स्प्रिंकल्स तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. नंतर ते सेट होण्यासाठी पाच ते दहा मिनिटांसाठी फ्रीजमध्ये ठेवावेत. फ्रिजरमध्ये ठेऊ नये. सेट झाल्यानंतर ते तुम्ही छान एका डिशमध्ये सर्व करून तुमच्या घरातील सदस्यांना व तुमच्या मित्र-मैत्रिणींना टेस्ट करायला देऊ शकता.
Location :
Chhatrapati Sambhaji Nagar,Maharashtra
First Published :
December 21, 2023 3:24 PM IST