90 वर्षांची परंपरा, पुण्यात मंडई मार्केटमध्ये स्टॉलवर कायम असते गर्दी
- Reported by:Prachi Balu Kedari
- local18
- Published by:Chetan Bodke
Last Updated:
सध्या हिवाळ्याचा हंगाम सुरू असून आरोग्याची काळजी घेण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात पौष्टिक आहाराकडे वळत आहेत. प्रोटीन, जीवनसत्त्वे आणि नैसर्गिक घटकांनी समृद्ध असलेला रानमेवा यामध्ये विशेष मागणीला आहे.
पुणे: सध्या हिवाळ्याचा हंगाम सुरू असून आरोग्याची काळजी घेण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात पौष्टिक आहाराकडे वळत आहेत. प्रोटीन, जीवनसत्त्वे आणि नैसर्गिक घटकांनी समृद्ध असलेला रानमेवा यामध्ये विशेष मागणीला आहे. पुण्यातील प्रसिद्ध मंडई मार्केटमध्ये विविध प्रकारचा सिझनेबल रानमेवा एकाच ठिकाणी उपलब्ध असून नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
मंडई मार्केटमध्ये बोर, चिंच, आवळा, चक्री आवळा, स्टार फ्रुट (कमरख), पॅशन फ्रुट, मसाला आवळा, कवट, काळी बोर, बडीशेप अशा विविध प्रकारच्या रानमेव्याचे स्टॉल्स आकर्षण ठरत आहेत. विशेष म्हणजे हा रानमेवा अवघ्या 20 रुपयांपासून उपलब्ध असल्याने सर्वसामान्य नागरिकांनाही सहज परवडणारा आहे. हिवाळ्यात शरीराला उष्णता व ताकद देणाऱ्या या मेव्यामुळे आरोग्याबाबत जागरूक असलेले ग्राहक आवर्जून येथे खरेदीसाठी येत आहेत.
advertisement
या बाजारात गेल्या 90 वर्षांपासून रानमेव्याचा व्यवसाय सुरू असलेले विक्रेते राजेंद्र शिंदे यांचा स्टॉल विशेष ओळखला जातो.हा व्यवसाय आमच्या आजींपासून सुरू असून सध्या तिसरी पिढी तो सांभाळत आहे. आजीला मदत म्हणून माझी आई आणि नंतर मी या व्यवसायात सहभागी झालो. मूळ व्यवसाय टू-व्हीलर मेकॅनिकचा असला तरी 1996 सालापासून रानमेव्याचा व्यवसायही सातत्याने करत आहे,अशी माहिती राजेंद्र शिंदे यांनी दिली.
advertisement
चिंच, बोर, चक्री आवळा यांसारखा माल थेट शेतकऱ्यांकडून घेतला जातो, तर काही रानमेवा स्थानिक मार्केटमधून आणला जातो. थेट शेतकऱ्यांकडून येणाऱ्या मालामुळे ताजेपणा आणि चव टिकून राहते, असे शिंदे सांगतात. आजींपासून सुरू असलेल्या या व्यवसायामुळे अनेक जुने ग्राहक आजही निष्ठेने येथे खरेदीसाठी येतात, हे या व्यवसायाचे मोठे वैशिष्ट्य आहे. स्टार फ्रुट, पॅशन फ्रुट, कवट यांसारखे काही रानमेवा हे पूर्णपणे सिझनेबल असल्याने वर्षभर उपलब्ध नसतात. मात्र हिवाळ्यात त्यांची चव आणि पौष्टिकता अधिक असल्याने मागणी वाढते.
advertisement
प्रोटीन आणि नैसर्गिक घटक मुबलक प्रमाणात असल्यामुळे तरुण, महिला तसेच ज्येष्ठ नागरिक या रानमेव्याला पसंती देत आहेत. हिवाळ्याच्या दिवसांत आरोग्य जपण्यासाठी नैसर्गिक पर्याय शोधणाऱ्यांसाठी पुण्याचे मंडई मार्केट हे रानमेव्याचे विश्वासार्ह ठिकाण ठरत असून, परंपरा आणि पौष्टिकतेचा संगम येथे अनुभवायला मिळत आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
Dec 27, 2025 8:38 PM IST









