मटक्यावर तयार केली भली मोठी रोटी, MAKING LIVE VIDEO पाहा
- Published by:News18 Marathi
Last Updated:
विदर्भातील मांडे अर्थात मटका रोटी खूप प्रसिद्ध आहे. या लांब पोळीमुळे जगभरात नागपूरची एक वेगळी अशी ओळख निर्माण झाली आहे.
पुणे, 23 डिसेंबर : महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती जगभरात प्रसिद्ध आहे. राज्यातील प्रत्येक भागातील प्रत्येक पदार्थ हा तितकाच चवीने खाल्ला जातो. त्यातल्या त्यात विदर्भातील खाद्य संस्कृती तर भन्नाटच! पोळी बनवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात खास पद्धत वापरली जाते. त्यात पोळीमध्ये विदर्भातील मांडे अर्थात मटका रोटी खूप प्रसिद्ध आहे. या लांब पोळीमुळे जगभरात नागपूरची एक वेगळी अशी ओळख निर्माण झाली आहे. मांडे नेमके कसे बनवतात पाहुयात
कसे बनवले जातात मांडे?
रुमाली रोटी सारखी दिसणारी ही रोटी पूर्णंत: गव्हाच्या पिठापासून तयार केली जाते. यासाठी लोकवान हे गहू वापरले जातात. ही पोळी बनविण्यासाठी वेगळा स्पेशल माठ तयार करण्यात येतो. मटण किवा चिकन सोबत ही रोटी खाण्यात वेगळीच मज्जा आहे. मात्र नॉनव्हेजशिवाय पाटवडी रस्सा किंवा कढाई पनीर, आमरस, श्रीखंड या सोबतही मटका रोटी खायला लोकांची पसंती आहे, अशी माहिती लक्ष्मी आदाम यांनी दिली आहे.
advertisement
वाफवलेले तुरीचे दाणे आणि शेंगदाण्याचा कूट, कोवळ्या हरभऱ्याच्या पानांची अशी करा घरीच भाजी
गहू बारीक दळून 20 मिनिटे भिजत घालावा लागतो. मोठ्या परातीत पिठात पाणी टाकत पीठ भिजवलं जात आणि वारंवार पटकलं जातं. त्यात चिक्की येईपर्यंत पटकलं जातं. नंतर पिठाचा गोळा हातावर लांब करुन अलगद माठावर टाकला जातो. पूर्णपणे शिजल्यानंतर, रोटी काळजीपूर्वक मटक्यावरून उतरवल्या जातात. या मटका रोट्या तयार करण्यासाठी महिलांना फार मेहनत घ्यावी लागते, अशी माहिती कांचन लोणारी यांनी दिली आहे.
advertisement
लोकवन गव्हाचा होतो वापर
लोकवन जातींचे गहू हे विशेषतः पुरणपोळी बनवण्यासाठी उपयुक्त ठरतात. इतर कोणत्याही जातीच्या गव्हापासून चांगली पुरणपोळी बनू शकत नाही. मात्र या जातीच्या गव्हापासून खूपच उत्कृष्ट पुरणपोळी बनत असते. यामुळे या जातीच्या गव्हाला बाजारात खूप मोठी मागणी असते. या जातीच्या गव्हाला बाजारात चांगला भावही मिळतो. त्यामुळे या गव्हापासूनच मटका रोटी बनवली जाते.
Location :
Pune,Pune,Maharashtra
First Published :
December 23, 2023 2:25 PM IST