वाफवलेले तुरीचे दाणे आणि शेंगदाण्याचा कूट, कोवळ्या हरभऱ्याच्या पानांची अशी करा घरीच भाजी

Last Updated:

हरभऱ्याच्या कोवळ्या पानांमध्ये जीवनसत्वे भरपूर प्रमाणात असतात. कमी साहित्यात आणि अगदी सोप्प्या पद्धतीने कमी वेळात बनवून तयार होणारी ही भाजी आहे.

+
News18

News18

वर्धा, 23 डिसेंबर : हरभऱ्याच्या कोवळ्या पानांमध्ये जीवनसत्वे भरपूर प्रमाणात असतात. विदर्भात हरभऱ्याच्या या कोवळ्या शेंड्याचा (पानांचा) उपयोग भाजीसाठीही केला जातो. कोवळी पाने तोडून आणून त्याला न धुता भाजी बनविली जाते. ही भाजी अतिशय चविष्ट बनते त्यामुळे सर्वजण आवडीने खातात. कमी साहित्यात आणि अगदी सोप्प्या पद्धतीने कमी वेळात बनवून तयार होणारी ही भाजी आहे. या भाजीची रेसिपी वर्ध्यातील गृहिणी हिना राऊत यांनी सांगितली आहे.
हरभऱ्याची भाजी बनवण्यासाठी साहित्य 
कोवळी तोडून घेतलेली हरभऱ्याची पाने, वाफवलेले तुरीचे दाणे, शेंगदाण्याचा कूट, हळद, तिखट, मीठ, जिरे, बारीक चिरलेला लसूण, बारीक चिरलेली हिरवी मिरची, चिरलेला टोमॅटो आणि चिरलेला कांदा हे साहित्य लागणार आहे.
हरभऱ्याच्या पानांची भाजी बनवण्यासाठी कृती 
सर्वप्रथम कढईमध्ये थोडसं तेल घेऊन त्यात जिरे आणि लसूण अ‍ॅड करायचा आहे. त्यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची चांगली परतून घ्यायची आहे. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालून परतून घ्यायचं आहे. आता आपल्याकडे असलेले मसाले म्हणजेच हळद, तिखट, मीठ आणि शेंगदाण्याचा कूट अ‍ॅड करायचा आहे. चांगलं परतून झाल्यानंतर चिरलेला टोमॅटो आणि वाफवलेले तुरीचे दाणे ॲड करून पुन्हा चांगलं परतून घ्यायचा आहे.
advertisement
आता हरभऱ्याची कोवळी तोडलेली पाने अ‍ॅड करून मस्तपैकी परतून घेऊन वाफ येण्यासाठी झाकून ठेवायची आहे.( ही पाने शेतातून तोडून आणल्यानंतर धुतली जात नाही असं म्हणतात की ही भाजी धुतली की त्याचे विटामिन्स आणि त्यातली थोडीशी खारट चव ही चालली जाते. त्यामुळे विशेष चव राहत नाही त्यामुळे ती धुतली जात नाही आहे तशीच तिला शिजवली जाते) एक वाफ काढून घेतल्यानंतर ही भाजी खाण्यासाठी तयार आहे. तुम्ही सर्व करून लगेच गरमागरम ही भाजी पोळी सोबत किंवा भाकरी सोबत खाऊ शकता,असं हिना राऊत सांगतात.
advertisement
ओल्या मटारची भजी कधी खाल्लेत का? घरीच बनवा सोपी रेसिपी Video
कोवळी तोडून आणलेली हरभऱ्याची पाने, वाफवलेले तुरीचे दाणे, शेंगदाण्याचा कूट, हळद, तिखट, मीठ, जिरे बारीक चिरलेला लसूण, बारीक चिरलेली हिरवी मिरची चिरलेला टोमॅटो आणि चिरलेला कांदा हे साहित्य घेऊन अगदी सोप्या पद्धतीने हरभऱ्याच्या कोवळ्या पानांची भाजी तुम्ही देखील एकदा तरी नक्की ट्राय करून बघा.
view comments
मराठी बातम्या/रेसिपी/
वाफवलेले तुरीचे दाणे आणि शेंगदाण्याचा कूट, कोवळ्या हरभऱ्याच्या पानांची अशी करा घरीच भाजी
Next Article
advertisement
CM Devendra Fadnavis On Thackeray Alliance:  ठाकरे बंधूंच्या युतीवर CM फडणवीसांचा पहिला वार, राज ठाकरेंवरही हल्लाबोल, 'भगवी शाल...'
ठाकरे बंधूंच्या युतीवर CM फडणवीसांचा पहिला वार, राज ठाकरेंवरही हल्लाबोल, 'भगवी श
  • ठाकरे बंधूंच्या युतीवर CM फडणवीसांचा पहिला वार, राज ठाकरेंवरही हल्लाबोल, 'भगवी श

  • ठाकरे बंधूंच्या युतीवर CM फडणवीसांचा पहिला वार, राज ठाकरेंवरही हल्लाबोल, 'भगवी श

  • ठाकरे बंधूंच्या युतीवर CM फडणवीसांचा पहिला वार, राज ठाकरेंवरही हल्लाबोल, 'भगवी श

View All
advertisement