'त्यांनी अनेक खून पचवले, परराज्यातील टोळीला सुपारी..." हत्येच्या कटाबाबत राम सातपुतेंचं खळबळजनक वक्तव्य
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
सोलापूरचे पालकमंत्री आणि भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी मंगळवारी खळबळजनक दावा केला आहे. यावर आता राम सातपुते यांनी खळबळजनक वक्तव्य केलं आहे.
प्रीतम पंडित, प्रतिनिधी सोलापूर: सोलापूरचे पालकमंत्री आणि भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी मंगळवारी खळबळजनक दावा केला आहे. माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. गोरे यांच्या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. सातपुते यांच्या हत्येचा कट नेमका कुणी आणि कशासाठी रचला? याबाबत चर्चांना उधाण आलं आहे. आता या सगळ्यावर माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते यांनी स्वत: हत्येबाबत मोठा खुलासा केल आहे.
हत्येच्या कटाबाबत पोलीस खातं आणि गुप्तचार विभाग चौकशी करत आहेत. त्यांना काही तरी गोष्टी निदर्शनास आल्या असून गुप्त माहिती देखील मिळाली आहे. एसपी, आयजी आणि राज्याच हेर खात हे सर्व मिळून तपास करत आहेत. लवकरच तपासात सत्य समोर येईल. सध्या मी याबाबत स्पष्ट बोलणार नाही, माझ्यामुळे ज्यांचं राजकीय अस्तित्व धोक्यात येतंय. ते सर्व लोक मिळून काही कट करत असल्याच पुढं येत आहे, असा खळबळजनक खुलासा सातपुते यांनी केला आहे.
advertisement
हत्येच्या कटात माळशिरस तालुक्यातील काही लोकांचा सहभाग असण्याची शक्यता आहे. त्यातल्या एकेकाला बोलवून तपास सुरू आहे. सर्व सामान्य घरातून आलेल्या राम सातपुतेच्या हत्येचा कट कुणी रचत असेल. तर याबाबत आमचं नेतृत्व योग्य ती दखल घेईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री जयकुमार गोरे आणि प्रदेश कार्यकारणी अध्यक्ष यांच्या कानावर मी ही बाब घातली आहे.
advertisement
प्रस्थापित घरांना घाबरणारा हा राम सातपुते नाही. असले 56 लोक पायाला बांधून राम सातपुते इथंपर्यंत आलेला आहे. अशा गोष्टींना मी घाबरत नाही. या लोकांनी अनेक खून पचवले आहेत. आता राम सातपुतेचा खूनही पचवू असं या लोकांना वाटत असेल. मात्र असं होणार नाही. हा राम सातपुते सुरक्षा मागणार नाही. आम्ही माळशिरसच्या जनतेला सुरक्षा देणारे आहोत. असल्या सुरक्षा घेऊन लढणारा मी माणूस नाही. माळशिरस तालुक्यातील जनतेचे मला 24 तास संरक्षण आहे, असंही राम सातपुते म्हणाले.
advertisement
माजी आमदार राम सातपुते पुढे म्हणाले, "उत्तम जानकर यांचा मुलगा आम्ही पाडला. अर्जुन सिंह मोहिते पाटील म्हणजे रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या चुलत भावाचा पंचायत समिती निवडणुकीत आम्ही पराभव केला. त्यामुळे अशा पद्धतीचे कट रचला जाईल, हे आम्ही गृहीत धरले. त्याला आम्ही संविधानिक मार्गाने उत्तर देऊ. येत्या काळात सर्व गोष्टींचं सत्य बाहेर येईल. राज्याबाहेरील काही टोळ्यांना सुपारी देण्याचा त्यांनी प्रकार केला आहे, असा खळबळजनक दावाही सातपुते यांनी केला.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
Feb 11, 2026 1:42 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'त्यांनी अनेक खून पचवले, परराज्यातील टोळीला सुपारी..." हत्येच्या कटाबाबत राम सातपुतेंचं खळबळजनक वक्तव्य








