अवघड वाटणारी मँगो मस्तानी 5 मिनिटांमध्ये होईल घरीच तयार, सोप्या रेसिपीचा Video

Last Updated:

आपल्याला असं वाटतं की मँगो मस्तानी करणं खूप अवघड आहे. पण ही मँगो मस्तानी करायला खूप सोपी असून अगदी झटपट तयार होते.

+
News18

News18

अपूर्वा तळणीकर, प्रतिनिधी 
छत्रपती संभाजीनगर : सध्या उन्हाळा सुरू आहे. उन्हाळ्यामध्ये सर्वत्र आंब्याचा मोसम असतो. त्यामुळे आपण आमरस तर नेहमीच करून खातो. आंब्याची अजून एक स्पेशल ड्रिंक म्हणजे मँगो मस्तानी. आपल्याला असं वाटतं की मँगो मस्तानी करणं खूप अवघड आहे. पण ही मँगो मस्तानी करायला खूप सोपी असून अगदी झटपट तयार होते. तुम्ही 5 मिनिटांमध्ये ही मस्तानी तयार करू शकता. तर मँगो मस्तानीची सोपी रेसिपी आपल्याला छत्रपती संभाजीनगरमधील प्रज्ञा तल्हार यांनी सांगितलेली आहे.
advertisement
मँगो मस्तानी बनवण्यासाठी लागणारे साहित्य
एक मोठा हापूस आंबा (तुम्ही या ठिकाणी कोणताही आंबा वापरू शकता) एक ग्लास भरून दूध, साखर, व्हॅनिला आईस्क्रीम (किंवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठली आईस्क्रीमचा फ्लेवर घेऊ शकता.) आंब्याचे फोडी आणि आवडीनुसार ड्रायफ्रूट्स हे साहित्य लागेल.
advertisement
मँगो मस्तानी बनवण्याची कृती 
सर्वप्रथम आपण जो आंबा घेतलेला आहे त्याच्या बारीक बारीक फोडी करून त्या मिक्सरच्या भांड्यात टाकायच्या आहेत. त्यामध्ये दूध टाकायचं आहे आणि यांची घट्टसर अशी प्युरी करून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्ही तुमच्या चवीनुसार यामध्ये साखर देखील टाकू शकता. याचे सगळं एकत्र मिश्रण करून घ्यायचं. ही तयार झालेली प्युरी आता सर्व्ह करायची आहे.
advertisement
उन्हाळ्यात शरीराला थंडावा देण्यासाठी बनवा हेल्थ स्मूदी, 5 मिनिटांमध्ये होईल तयार Video
सर्व्ह करण्यासाठी एका ग्लासमध्ये सर्वप्रथम व्हॅनिला आईस्क्रीम टाकायची. त्यानंतर त्यावरती मँगोची प्युरी टाकायची. वरतून परत व्हॅनिला आईस्क्रीम टाकायची. मॅंगोची प्युरी टाकायची. त्यावरून आपण जे आंब्याचे काप करून ठेवलेले आहेत ते त्यावरतून टाकायचे. जर तुम्हाला आवडत असेल तर त्यावरती तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स देखील टाकू शकता. अश्या पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीची मँगो मस्तानी बनवून तयार होते.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/रेसिपी/
अवघड वाटणारी मँगो मस्तानी 5 मिनिटांमध्ये होईल घरीच तयार, सोप्या रेसिपीचा Video
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement