सकाळी नाश्त्यासाठी बनवा मटार कटलेट, झटपट होईल तयार, नोट करा रेसिपी
- Reported by:Sakshi Sushil Patil
- Published by:Mohan Najan
Last Updated:
दररोज नाश्त्यासाठी नवनवीन पदार्थ कोणते करायचे, असा प्रश्न पडतो. अशावेळी तुम्ही झटपट होणारे टेस्टी मटार कटलेट ट्राय करू शकता.
साक्षी पाटील, प्रतिनिधी
डोंबीवली : दररोज नाश्त्यासाठी नवनवीन पदार्थ कोणते करायचे, असा प्रश्न पडतो. अशावेळी तुम्ही झटपट होणारे टेस्टी मटार कटलेट ट्राय करू शकता. सध्या मार्केटमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात मटार आलेले आहे आणि स्वस्त सुद्धा आहेत. त्यामुळे ही रेसिपी अगदी झटपट आणि स्वस्तात होणारी आहे. हेच मटार कटलेट कसे बनवायचे याची रेसिपी गृहिणी शोभा पोळ यांनी सांगितली आहे.
advertisement
मटार कटलेटसाठी लागणारे साहित्य
2 वाटी मटार, 1 ते 2 उकडलेले बटाटे, एक वाटी भिजवलेले पोहे, 2 चमचा आल-लसूण पेस्ट, 1/2 वाटी रवा, दोन चमचे मिरचीचा खरडा, कोथिंबीर, मीठ चवीनुसार, तेल हे साहित्य लागेल.
मटार कटलेट बनवण्याची कृती
सर्वप्रथम मटार सोलून घेऊन पाच मिनिटे पाण्यात शिजवून घ्या. त्यानंतर शिजवलेल्या मटार मध्ये एक वाटी पोहे, उकडलेले दोन बटाटे, आले लसूण पेस्ट, मिरचीचा खरडा, हळद, कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालून एकजीव करून घ्यावे. मिश्रण व्यवस्थित झाल्यानंतर जर थोडं चिकट झालं असेल तर त्यामध्ये अर्धा वाटी बेसन घालावे आणि पुन्हा व्यवस्थित मिश्रण करावे.
advertisement
आता कटलेटचे मिश्रण तयार झालेले आहे या मिश्रणाचे आता बारीक बारीक चपटे गोळे करून घ्यायचे. मिश्रणाचे कटलेट बनवून झाल्यावर त्याला दोन्ही बाजूंनी रवा लावून तुम्ही तेलामध्ये शॅलो फ्राय करू शकता किंवा डीप फ्राय सुद्धा करू शकता. डीप फ्राय करत असाल तर लाल रंग येईपर्यंत कटलेट तळून घ्या. अशा पद्धतीने आपले मटार कटलेट तयार आहेत तुम्ही मिरचीच्या खरड्या बरोबर किंवा टोमॅटो सॉस बरोबर हे कटलेट सकाळी नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळी स्नॅक्ससाठी खाऊ शकता.
view commentsLocation :
Thane,Maharashtra
First Published :
Feb 05, 2025 7:21 PM IST









