सायंकाळी नाश्त्यासाठी बनवा मूग डाळ आणि पालकाचे वडे, अश्या पद्धतीनं बनतील टेस्टी
- Reported by:Pragati Bahurupi
- Published by:Mohan Najan
Last Updated:
अमरावतीमध्ये सायंकाळी नाश्त्यासाठी जास्तीत जास्त मूंग डाळ आणि पालकाचे वडे बनवले जातात. हे वडे खाण्यासाठी अतिशय टेस्टी आणि कुरकुरीत लागतात.
प्रगती बहुरुपी, प्रतिनिधी
अमरावती : हिवाळ्यात सायंकाळी नाश्त्यासाठी काहीतरी गरम गरम, कुरकुरीत असा पदार्थ खावासा वाटतो. तेव्हा जास्तीत जास्त भजी बनवले जातात. त्यात आणखी एक ऑप्शन म्हणून तुम्ही मूग डाळ आणि पालकाचे वडे बनवू शकता. हे वडे अगदी झटपट बनतात आणि सगळ्यांना आवडेल असे आहेत. तर हिवाळ्यात सायंकाळी नाश्त्यासाठी मूग आणि पालकाचे वडे कसे बनवायचे याचीच रेसिपी आपल्याला अमरावतीमधील गृहिणी रसिका शेळके यांनी सांगितली आहे.
advertisement
मूग आणि पालकाचे वडे बनवण्यासाठी साहित्य
1 वाटी मूग डाळ, पालक, कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर, कडीपत्ता, जिरे, धनी पावडर, मीठ हे साहित्य लागेल.
मूग आणि पालकाचे वडे बनवण्यासाठी कृती
सर्वात आधी मूग डाळ 2 ते 3 तास भिजत घालायची. त्यानंतर धुवून घ्यायची आणि वाळत टाकायची. त्यानंतर मिक्सरमधून बारीक करून घ्यायची. पूर्ण डाळ बारीक करायची नाही. वडे कुरकुरीत होण्यासाठी काही डाळ तशीच द्यायची. त्यानंतर त्यात जिरे, मीठ, पालक, कांदा, हिरवी मिरची, कडीपत्ता, कोथिंबीर हे सर्व साहित्य घालून डाळ मिक्स करायची. वड्याची बाईंडिंग व्यवस्थित होण्यासाठी त्यात तुम्ही बेसन पीठ घालू शकता.
advertisement
डाळ आणि इतर साहित्य पूर्णतः मिक्स करून घ्यायचं आणि गोल छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे. वडे तळून घेण्यासाठी कढाईमध्ये तेल घालून ते कमी आचेवर तापून घ्यायचं आहे. तेल तापल की गोळे हातावर प्रेस करून त्याचे वडे तयार करून घ्यायचे आहे.
एकावेळी वडे तयार करायचे नाही. एक एक करून तळून घ्यायचा आहे. कमी आचेवर संपूर्ण वडे तळून घ्यावेत. त्यानंतर ते वडे तुम्ही टोमॅटो सॉस सोबत खाऊ शकता. तसेही वडे खाण्यासाठी छान लागतात. यासोबत तुम्ही शेंगदाण्याची चटणी सुद्धा बनवू शकता. मूग डाळ आणि इतर मिक्स डाळीपासून सुद्धा तुम्ही टेस्टी असे वडे बनवू शकता. ज्यांना तेलकट चालत नसेल ते वड्यांना सेलो फ्राय सुद्धा करू शकतात.
view commentsLocation :
Amravati,Amravati,Maharashtra
First Published :
Nov 22, 2024 4:50 PM IST
मराठी बातम्या/रेसिपी/
सायंकाळी नाश्त्यासाठी बनवा मूग डाळ आणि पालकाचे वडे, अश्या पद्धतीनं बनतील टेस्टी







