advertisement

Patwadi Recipe: पारंपरिक खमंग चव असलेली पाटवडी, झटपट होईल तयार, रेसिपीचा Video

Last Updated:

मराठी घराघरात प्रिय असलेला पारंपरिक खमंग चव असलेला पाटवडी हा पदार्थ अनेकदा विशेष प्रसंगी बनवला जातो. घरगुती चव आणि सोपी कृती यामुळे पाटवडी हा कायमस्वरूपी मराठी खाद्यसंस्कृतीचा अविभाज्य भाग ठरला आहे.

+
News18

News18

मुंबई: मराठी घराघरात प्रिय असलेला पारंपरिक खमंग चव असलेला पाटवडी हा पदार्थ अनेकदा विशेष प्रसंगी बनवला जातो. काही भागांत या स्वादिष्ट पदार्थाला थापी वडे असेही म्हणतात, हे फारच कमी लोकांना माहीत आहे. पिढ्यान्पिढ्या चालत आलेल्या या पारंपरिक पदार्थाची लोकप्रियता आजही अबाधित आहे. घरगुती चव आणि सोपी कृती यामुळे पाटवडी हा कायमस्वरूपी मराठी खाद्यसंस्कृतीचा अविभाज्य भाग ठरला आहे. पाटवडी कशी बनयावची याची रेसिपी आपल्याला वैशाली कांबळे यांनी सांगितली आहे.
पाटवडी बनवण्यासाठी साहित्य (4 ते 5 जणांसाठी)
  • बेसन – 1 वाटी
  • आलं-लसूण पेस्ट – 1 चमचा
  • हिरव्या मिरच्या- 2 बारीक चिरलेल्या
  • हळद – ¼ चमचा
  • हिंग – 1 चिमूट
  • मीठचवीनुसार
  • advertisement
  • पाणीअंदाजे 1 ते १½ कप
  • तेल – 2 चमचे (मोहनासाठी), व थापण्यासाठी थोडंसं
  • कांदा- 1 बारीक चिरलेला
  • मोहरी- 1 चिमूट
  • कडीपत्ता – 8–10
  • पाटवडी बनवण्याची कृती
    कढईमध्ये 2 चमचे तेल टाकाते गरम झाले की त्यात आलं-लसूण पेस्ट, हिरव्या मिरच्याकांदाकढीपत्ताहळद, जिरेमीठ सगळं टाकून लालसर परतून घ्या.
    advertisement
    त्यात एक ग्लास पाणी घाला आणि उकळी आली की त्यात बेसनपीठ हळूहळू टाकत ते व्यवस्थित मिक्स करून घ्या. हे मिश्रण गॅसवर मध्यम आचेवर ठेवून सतत हलवत शिजवा. मिश्रण घट्ट होईपर्यंत (हाताला चिकटणार नाही इतकं) शिजवा. यासाठी 7–8 मिनिटं लागतात.
    advertisement
    एक स्टीलची थाळी, परात किंवा ट्रे घ्या. त्याला थोडंसं तेल लावून घ्यात्यात गरम मिश्रण ओता आणि लगेचच पाट्याने किंवा ओल्या हाताने समतल थापा. थोडं थंड झाल्यावर त्याचे चौकोनी किंवा डायमंड तुकडे करा. आणि ते तव्यावर किंवा कढईत तळून घ्या. मग आपली पाटवडी तयार होईल.
    advertisement
    गरम पाटवडी सोबत मिरचीचा ठेचा, लसूण चटणी किंवा गोड-तिखट रस्सा छान लागतोभाकरी किंवा पोळीच्या जोडीनेही हे एक झणझणीत जेवण बनू शकतं.
    view comments
    मराठी बातम्या/रेसिपी/
    Patwadi Recipe: पारंपरिक खमंग चव असलेली पाटवडी, झटपट होईल तयार, रेसिपीचा Video
    Next Article
    शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी; घराची किंमत ऐकून थक्क व्हाल
    शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी
    • कोटींचा टॅक्स भरून गिलने 'या' मजल्यावर बुक केला फ्लॅट

    • नव्या घराचे इनसाईड डिटेल्स आले समोर

    • 3300 स्क्वेअर फुटांचा फ्लॅट अन् बरंच काही...

    View All
    advertisement