Turmeric Water Trend: हळद-पाण्याच्या ट्रेंडमुळे तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा? नाशिकच्या ज्योतिषांनी सांगितलं सत्य
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Kunal Santosh Dandgaval
Last Updated:
Turmeric Water Trend: सध्या सोशल मीडियावर पाण्यात हळद टाकण्याचा ट्रेंड सुरू असून अनेकांचे व्हीडिओ व्हायरल होत आहेत. याच ट्रेंडबाबत नाशिकचे महंत अनिकेत शास्त्री यांनी माहिती दिलीये.
नाशिक: सध्या सोशल मीडियावर एक नवीन ट्रेंड व्हायरल होताना दिसत आहे. सर्व तरुण तरुणी पाण्यामध्ये हळदी टाकून आपले व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत. हा प्रकार सोशल मीडियावर ट्रेंड करत असला तरी योग्य की अयोग्य यावरून देखील चर्चा झडत आहेत. काही ज्योतिषी आणि इतरांनी हे चुकीचं असल्याचं सांगितलं, तर काहींनी हळद ही पवित्र असल्याचं सांगत त्यात गैर काही नसल्याचं म्हटलंय. नाशिक येथील धर्मशास्त्र अभ्यासक महंत डॉ. अनिकेत शास्त्री यांच्याकडून याबाबत जाणून घेऊ.
धर्म शास्त्रातच नाही तर वेदांमध्ये देखील हळदीला विशेष महत्त्व आहे. हिंदू धर्मात कुठल्याही प्रकारची पूजा करताना हळदीचा वापर केला जातो. त्याचबरोबर जन्माला आल्यापासून ते मृत्यूपर्यंत आपण हळदीचा वापर आपल्या जीवनात करत असतो. फक्त पूजेसाठीच नव्हे तर भारतात हळदीचा वापर खाद्य पदार्थांत देखील केला जातो, अशी माहिती शास्त्री यांनी दिली आहे.
advertisement
सोशल मीडियावर जे काही व्हीडिओ सध्या प्रसारित होत आहेत, तो एक आनंदाचा भाग आहे. ही कुठलीही तंत्र क्रिया नाही. भलेही अघोरी पूजेमध्ये हळदीचा वापर होत असला तरी देखील आपण आपल्या आनंदासाठी ते करतो. कुठलेही मंत्र उच्चारून करत नाही, त्यामुळे कोणतीही भीती बाळगू नये, असे शास्त्री सांगतात.
advertisement
अघोरी पूजेमध्ये देखील हळदीचा वापर हा मांस खराब होऊ नये, या करिता केला जातो. वैज्ञानिक तथ्यांपासून ते धार्मिक गोष्टींमध्ये हळदीचा वापर केला जात असतात. सध्या व्हीडिओ सोशल मीडियावर प्रसारित होत आहे. याने कुठल्याही प्रकारची बाधा होणार नसल्याचे शास्त्र अभ्यासक डॉ. अनिकेत शास्त्री यांनी सांगितले आहे.
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
June 28, 2025 12:59 PM IST
मराठी बातम्या/Viral/
Turmeric Water Trend: हळद-पाण्याच्या ट्रेंडमुळे तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा? नाशिकच्या ज्योतिषांनी सांगितलं सत्य