Gold Rate: सोनं एक लाखांच्या पार, खरेदीचा ट्रेंडच बदलला, सराफा बाजारातून मोठं अपडेट
- Reported by:Kale Narayan
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Gold Rate: गेल्या काही काळात सोन्या-चांदीच्या दरांत मोठी वाढ झाली आहे. सोन्याचे भाव एक लाखांच्या पार गेल्याने दागिने खरेदीचा ट्रेंडच बदलला आहे.
जालना: सोने आणि चांदीच्या दरामध्ये सातत्याने होत असलेल्या वाढीमुळे सराफा दुकानांमध्ये ग्राहकांची संख्या देखील मंदावली आहे. त्याचबरोबर सोने आणि चांदी खरेदीच्या ट्रेंड्समध्येही बदल झाला आहे. सराफा व्यावसायिकांनी दिलेल्या माहितीनुसार नवे दागिने खरेदी करण्याऐवजी जुने दागिने मोडून नवीन दागिने तयार करून घेण्याकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. याबाबत जालना सराफा असोसिएशनचे सचिव गिरीधरलाल लाधानी यांनी माहिती दिलीये.
सध्या सोन्याचा दर हा जीएसटी सह एक लाखांच्या वर आहे. तर चांदी एक लाख 8 हजार रुपये प्रति किलो या दराने विक्री केली जात आहे. सर्वसामान्य ग्राहकांना सोनं आणि चांदी थेट दुकानात येऊन खरेदी करणे आवक्याबाहेर जात आहे. यामुळेच दुकानात येणारे 40 टक्के ग्राहक हे जुने दागिने मोडून नवे दागिने करण्यास प्राधान्य देत आहे, असं गिरीधरलाल लाधानी सांगतात.
advertisement
विविध जागतिक संस्थांनी सोन्याचे दर हे 3500 अमेरिकी डॉलर्स पर्यंत जातील असं भाकीत वर्तवलं होतं. ते भाकीत खरं ठरलं आहे. जागतिक पातळीवर अशांतता कायम राहिल्यास सोन्याचे दर 4000 अमेरिकी डॉलर्स पर्यंत जाऊ शकतात. तर जगात शांतता निर्माण झाल्यास ते 31 ते 3200 पर्यंत खाली येऊ शकतात. भारतीय रुपयांमध्ये अशांतता कायम राहिल्यास दर एक लाख 25 हजार पर्यंत वाढू शकतात, तर जगात शांतता प्रस्थापित झाल्यास हेच दर 85 ते 90 हजारांच्या दरम्यान राहतील, असंही लाधानी यांनी सांगितलं.
advertisement
दरम्यान, सध्याच्या काळात सोन्याच्या दरांत झालेली वाढ ही जास्त आहे. यापेक्षा अधिक दरवाढ झाल्यास ग्राहक आणि व्यापारी दोघांसाठीही हानिकारक असल्याचे लाधानी यांनी सांगितलं.
Location :
Jalna,Maharashtra
First Published :
Jun 27, 2025 2:00 PM IST
मराठी बातम्या/मनी/
Gold Rate: सोनं एक लाखांच्या पार, खरेदीचा ट्रेंडच बदलला, सराफा बाजारातून मोठं अपडेट






