झटपट बनवा हिवाळ्यात तिळगुळ आणि शेंगदाण्याचे लाडू, पाहा संपूर्ण रेसिपी VIDEO
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
हिवाळ्यामध्ये अनेक वेळा गोड, तिखट, आंबट असे विविध पदार्थ खाण्याची इच्छा होते. तेव्हा बाहेरील पदार्थावर जास्त भर दिला जातो. पण, त्यामुळे आरोग्यावर परिणाम होतो. जेव्हा तुम्हाला गोड खाण्याची इच्छा होते तेव्हा चॉकलेट न खाता तुम्ही तिळाचे लाडू खाऊ शकता.
प्रगती बहुरुपी, प्रतिनिधी
अमरावती : हिवाळ्यामध्ये अनेक वेळा गोड, तिखट, आंबट असे विविध पदार्थ खाण्याची इच्छा होते. तेव्हा बाहेरील पदार्थावर जास्त भर दिला जातो. पण, त्यामुळे आरोग्यावर परिणाम होतो. जेव्हा तुम्हाला गोड खाण्याची इच्छा होते तेव्हा चॉकलेट न खाता तुम्ही तिळाचे लाडू खाऊ शकता. तीळ, शेंगदाणे आणि गुळाचे लाडू बनवायला अगदी सोपे आहेत आणि घरगुती साहित्यापासून बनवता येतात. तीळ गुळ आणि शेंगदाण्याचे लाडू कसे बनवायचे? याबद्दलच अमरावतीमधील गृहिणी जया भोंडे यांनी माहिती दिली आहे.
advertisement
लाडू बनविण्याचे साहित्य
तीळ, गूळ, शेंगदाणे हे साहित्य तुम्हाला ही रेसिपी बनवण्यासाठी लागेल .
लाडू बनविण्याची कृती
सर्वात आधी तीळ आणि शेंगदाणे भाजून घ्यायचे. तीळ जास्त लाल होऊ द्यायचे नाही हलके भाजून घ्यायचे. शेंगदाणे चांगले भाजून घ्यायचे. त्यानंतर तीळ आणि शेंगदाणे मध्यम असे म्हणजे जास्त जाड पण नाही आणि बारीक पण नाही अशा प्रमाणात बारीक करून घ्यायचे. त्यानंतर ते मिक्स करून घ्यायचं. गूळ हा किसणीच्या साहाय्याने बारीक करून घ्यायचा. जेणेकरून त्यात गडे राहणार नाही.
advertisement
त्यानंतर गूळ आणि ते मिश्रण पूर्ण एकत्र मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर त्यात ओलसर पण नसेल तर पाणी किंवा दूध हे दोन ते तीन थेंब घालायचं. त्यानंतर लाडू वळून घ्यायचे. लाडू अगदी सहज वळले जातात. त्यानंतर लाडू खाण्यासाठी तयार होईल. लाडू बनवायला अगदी सोपे आहे. ना पाक बनवण्याचा त्रास ना लाडू कडक होईल अशी भीती. तुम्ही नक्की बनवून बघा तीळ, गूळ आणि शेंगदाण्याचे लाडू.
Location :
Amravati,Maharashtra
First Published :
November 07, 2024 8:07 PM IST