Soybean Paratha: मुलांना शाळेत डब्यामध्ये काय द्यायचं? चिंता सोडा, फक्त 10 मिनिटांत बनवा सोयाबीनचा पराठा, खातील आवडीने
- Published by:Mohan Najan
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
शाळा सुरू झाल्यानंतर रोज मुलांना डब्यामध्ये काय द्यायचे हा प्रत्येक आईसमोर मोठा प्रश्न असतो. ते हेल्दी देखील असावं असं देखील वाटतं. तर तुम्ही चटपट असा सोयाबीनचा पराठा करू शकता.
छत्रपती संभाजीनगर: आता लवकरच शाळा सुरू होणार आहेत. शाळा सुरू झाल्यानंतर रोज मुलांना डब्यामध्ये काय द्यायचे हा प्रत्येक आईसमोर मोठा प्रश्न असतो. ते हेल्दी देखील असावं असं देखील वाटतं. तर तुम्ही चटपट असा सोयाबीनचा पराठा करू शकता. अगदी झटपट बनवून आणि कमी साहित्यामध्ये बनवून हा पराठा तयार होतो. याची रेसिपी आपल्याला गृहिणी प्रज्ञा तल्हार यांनी सांगितली आहे.
सोयाबीन पराठ्यासाठी लागणारे साहित्य
एक वाटी गव्हाचे पीठ, सोयाबीनच्या वड्या, पाणी, कोथिंबीर, चवीनुसार मीठ, लाल तिखट, लसूण, साजूक तूप, पिझ्झा पास्ता मसाला हे साहित्य लागेल.
सोयाबीनचा पराठा बनवण्याची कृती
सर्वप्रथम एका मोठ्या भांड्यात एक वाटी गव्हाचा पीठ घ्यायचं. त्यामध्ये दोन चमचे साजूक तूप टाकायचं. ते एकत्र करून घ्यायचं आणि गरजेनुसार पाणी टाकून मऊसुत असा गोळा तयार करून घ्यायचा. गोळा थोडा वेळ बाजूला ठेवायचा. सोयाबीनच्या वड्या या दहा ते पंधरा मिनिटं पाण्यामध्ये भिजत ठेवायच्या. त्यानंतर ह्या वड्यातलं सगळं पाणी व्यवस्थित काढून घ्यायचं. मिक्सरच्या भांड्यात टाकून या वड्या बारीक करून घ्यायच्या. आता या बारीक झालेल्या वड्यामध्ये तुम्ही तिखट, लसूण, मीठ, पिझ्झा पास्ता मसाला, कोथिंबीर टाकून हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं. आता तयार केलेल्या गोळ्याची पोळी लाटून घ्यायची.
advertisement
त्यामध्ये हे सोयाबीनच्या वड्यांचं मिश्रण टाकायचं आणि व्यवस्थित असं हा पराठा लाटून घ्यायचा. तव्यावर पराठा टाकण्याआधी थोडसं तूप टाकायचं आणि व्यवस्थित असाच चांगला हा पराठा भाजून घ्यायचा. पराठा भाजत असतानाच त्यावरती थोडसं तूप टाकून भाजून घ्यायचा. अशा पद्धतीने हा सोयाबीनचा पराठा बनवून तयार होतो. तुम्ही हा मुलांना टोमॅटो केचप सोबत खायला देऊ शकता. तर अगदी झटपट असा दहा मिनिटांमध्ये हा सोयाबीनचा पराठा बनवून तयार होतो. तर तुमच्या मुलांना नक्की टिफिनमध्ये हा पराठा तुम्ही द्या. नक्कीच त्यांना आवडेल.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
June 03, 2025 4:46 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/रेसिपी/
Soybean Paratha: मुलांना शाळेत डब्यामध्ये काय द्यायचं? चिंता सोडा, फक्त 10 मिनिटांत बनवा सोयाबीनचा पराठा, खातील आवडीने