Mutton Rassa Recipe : सेम ढाबा स्टाईल चवं, आगरी पद्धतीने बनवा झणझणीत मटण रस्सा घरीच, रेसिपीचा Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:GEETA PANDHARINATH GAIKAR
Last Updated:
हा पदार्थ बनवण्यासाठी विशेष आगरी मसाला वापरला जातो, ज्यामध्ये लाल मिरची पावडर आणि इतर मसाले असतात.
ठाणे : नॉनव्हेज प्रेमींना वेगवेगळ्या पद्धतीने मटण, चिकन, मासे खाण्याची सवय असते. परंतु काहींना मटणामध्येच काहीतरी वेगळ्या पद्धतीने भाजी किंवा सुका मटण, लाल मटण सहज बनवतो. परंतु आपल्याला हवी असलेली चव आणि मसालेदार मटण आपण साध्या आणि सोप्या पद्धतीत घरीच बनवू शकतो. झणझणीत आगरी मटण हा एक महाराष्ट्रातील, विशेषतः किनारपट्टीवरील, मसालेदार आणि चविष्ट मटण रस्सा आहे.
हा पदार्थ बनवण्यासाठी विशेष आगरी मसाला वापरला जातो, ज्यामध्ये लाल मिरची पावडर आणि इतर मसाले असतात. हा पारंपरिक महाराष्ट्रीयन पदार्थ बनवण्यासाठी ताजे मटण वापरून त्याला हळद आणि लसूण लावून शिजवले जाते. त्यामुळे हा मटण रस्सा अनेक जण खाण्यासाठी ढाबा किंवा चांगले रेस्टॉरंट शोधत असतात. पण आज आपण याच पद्धतीने मटण घरीच बनवू शकतो.
advertisement
बनण्यासाठी साहित्य
500 ग्रॅम मटण (हाडांसहित)
100 ग्रॅम बटाटे (तुकडे केलेले)
125 ग्रॅम कांदे (लांब चिरलेले)
2 चमचे आले-लसूण पेस्ट
1 मोठा टोमॅटो (चिरलेला) आगरी मसाला, हळद, मीठ (चवीनुसार) तेल
वाटण (खोबरे, लसूण, आलं, कोथिंबीर, वेलची, जिरं)
advertisement
बनण्याची कृती
मटण तयार करा: मटणाचे तुकडे स्वच्छ धुवा.
कांदा परता: तेलात कांदा सोनेरी होईपर्यंत परतून घ्या. मसाला तयार करा: त्यात आले-लसूण पेस्ट, टोमॅटो आणि आगरी मसाला घालून चांगले परता.
मटण शिजवा: मटणाचे तुकडे आणि हळद घालून चांगले मिसळा. आवश्यकतेनुसार पाणी घाला आणि झाकण ठेवून मटण पूर्णपणे शिजेपर्यंत शिजवा. बटाट्याचे तुकडे शेवटी घाला (गरज वाटल्यास) ज्यामुळे ते मऊ होतील.
advertisement
चव तपासा: मिठासारखे मसाले योग्य प्रमाणात आहेत की नाही ते तपासा आणि आवश्यक असल्यास ते घाला. शिजल्यानंतर वरून कोथिंबीर घालावी.
गरम सर्व्ह करा: आगरी मटण तयार हे गरमागरम भाकरी किंवा भातासोबत सर्व्ह करू शकतो.
view commentsLocation :
Thane,Maharashtra
First Published :
November 18, 2025 7:30 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/रेसिपी/
Mutton Rassa Recipe : सेम ढाबा स्टाईल चवं, आगरी पद्धतीने बनवा झणझणीत मटण रस्सा घरीच, रेसिपीचा Video

